ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे थ्रोडाउन स्पेशालिस्ट डी राघवेंद्र यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रविवारी ते दुबईला रवाना होणार होते. पण कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ते 14 दिवस क्वारंटाईन राहतील. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते युएईला रवाना होण्याची शक्यता आहे.
मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “राघवेंद्र रविवारी अन्य सपोर्ट स्टाफसह युएईला जाणार होते, पण कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे ते यूएईला जाऊ शकले नाही.”
ऑस्ट्रेलियाला दौऱ्याला मुकण्याची शक्यता
एका सूत्राने मुंबई मिररला सांगितले की, “ते दुबईला गेले नाहीत आणि ते ऑस्ट्रेलियामध्येही जाणार नाहीत.”
रवि शास्त्री समवेत इतर कर्मचारी यूएईला रवाना
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि व्यवस्थापक गिरीश डोंगरे हे ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रविवारी दुबईला पोहोचले आहेत. शास्त्री यांच्यासह अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीही दुबईला पोहोचले. तिथे ते एका स्वतंत्र बायो बबलमध्ये राहतील. आयपीएल 10 नोव्हेंबरला संपल्यानंतर भारतीय संघ चार्टर्ड प्लेनमधून थेट युएईहून ऑस्ट्रेलियाकडे रवाना होईल. यानंतर त्यांना तेथे 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.
भारतीय संघ खेळणार 3 वनडे, 3 टी -20 आणि 4 कसोटी सामने
आयपीएल 10 नोव्हेंबरला संपल्यानंतर भारतीय संघ थेट युएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. त्यानंतर ते 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील. त्यानंतर भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऍडिलेडमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला 3 टी20 सामन्यांची मालिका होईल.
मर्यादीत षटकांच्या मालिकांनंतर ऍडिलेडमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. दिवस-रात्र कसोटी सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल. परदेशात भारत पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर परंपरेनुसार मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल. तिसरा कसोटी सामना सिडनी येथे 7 ते 11 जानेवारीदरम्यान खेळला जाईल. अंतिम कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये 15 ते 19 जानेवारीदरम्यान होईल.
ऑस्ट्रेलियात कुटुंबियांना सोबत नेण्याची खेळाडूंनी केली मागणी
भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयकडे कुटुंबीयांना ऑस्ट्रेलिया दौर्यावर नेण्याची मागणी केली आहे. तथापि, मंडळाकडून अद्याप याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने कुटुंबाला समवेत नेण्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा टी-२०, वनडे आणि कसोटी संघाची संपुर्ण यादी
ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु; प्रशिक्षक रवि शास्त्रींसमवेत दोन दिग्गज खेळाडू यूएईला रवाना
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिन्ही संघात स्थान पटकणारे शिलेदार
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल