12 मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 3 सामन्यांच्या वनडे (3 Matches of ODI Series) मालिकेला सुरुवात होणार आहे. या वनडे मालिकेचे आयोजन भारत करणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) आज 15 जणांचा भारतीय संघ घोषित केला आहे.
भारताच्या वनडे संघात सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan), वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
या मालिकेसाठी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, मयंक अगरवाल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात संधी मिळालेली नाही.
रोहित वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नसल्यामुळे धवनबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी केएल राहुल, शुबमन गिल किंवा पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) संधी मिळू शकते.
त्याचबरोबर भारतीय संघात कर्णधार विराट कोहली, मनीष पांडे, श्रेयस अय्यर हे फलंदाज आहेत. तर अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजाचा समावेश आहे. तसेच युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, नवदीप सैनी असे गोलंदाज भारतीय संघात आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 12 मार्चपासून ही वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे. त्यानंतर 15 मार्चला लखनऊ येथे दुसरा वनडे सामना होईल. तर तिसरा वनडे सामना 18 मार्चला कोलकाता येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिखर धवन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंंत, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियावर मात करत ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजयी






