एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत देशभरातून 120हुन अधिक खेळाडू सहभागी

पुणे। डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व एपीएमटीए यांच्या संलग्नतेने एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत राज्यातून 120हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

ही स्पर्धा डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे दि. 9 ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेसाठी मुंबई, कोल्हापुर, सांगली, नगर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, खामगाव, सोलापुर येथुन प्रवेशीका आल्या आहेत.

You might also like