ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात पाकिस्तानने मोठी धावसंख्या केली आणि आणि ऑस्ट्रेलिया सध्या फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साजिद खान आणि दिग्गज डेविड वॉर्नर यांच्यात वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा जेव्हा खेळपट्टीवर खेळत होते, तेव्हा ही घटना घडली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १४ व्या षटकात साजिद खान गोलंदाजीसाठी आला होता. षटकातील एक चेंडू ज्या पद्धतीने वळला, ते पाहून वॉर्नर हैराण झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर ते भाव स्पष्टपणे दिसत होते. त्याच चेंडूवर गोलंदाज पुढे धावत आला आणि वॉर्नरच्या डोळ्यात डोळे घालून त्याला एकप्रकरे खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. पण नंतर वॉर्नरने हसून प्रतिक्रिया दिली. या दोघांमधील संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात दिली. पाकिस्ताने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर ४४६ धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. असे असले तरी, वॉर्नरला खुन्नस देणाऱ्या साजिद खाननेच त्याची विकेट घेतली. वॉर्नर ६८ धावांवर खेळत असताना साजिदने त्याला क्लीन बोल्ड केले. उस्मान ख्वाजानेही मोठी खेळी केली, पण अवघ्या ३ धावा कमी पडल्यामुळे त्याचे शतक हुकले. त्याने ९७ धावा केल्या.
🤨 😄#BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Bt7XV4WNmH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 6, 2022
दरम्यान, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियातील हा सामना जवळपास अनिर्णीत होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानने पहिला डाव ४७६ धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियनेही संयमी खेळ दाखवला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सच्या नुकसानावर २७१ धावा केल्या. पुढच्या दोन दिवसांमध्ये दोन्ही संघाचा दुसरा डाव खेळून होईल अशी शक्यता कुठेच दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या –
‘जडेजाला धावांची भूक, जे संघहिताचेच’, कर्णधार रोहितने कौतुकाने थोपटली पाठ
कपिल देवचा विक्रम मोडल्यानंतर आर अश्विन भावुक; म्हणाला, ‘मी क्रिकेटचा आभारी, मला कधीच वाटले…’
नेतृत्त्वात हिट, तर फलंदाजीत फ्लॉप; स्वत:च्या सरासरी प्रदर्शनावर पृथ्वी शॉ म्हणाला, ‘हे ठीक आहे…’