---Advertisement---

बांगलादेशच्या यष्टीरक्षकाचा पाकिस्तानात धोनीसारखा पराक्रम, ‘या’ खास यादीत मिळवले स्थान

litton das
---Advertisement---

पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात बांगलादेशची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. हा सामनाही जिंकण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. या कसोटी सामन्यात बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासने (Litton Das) आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीमुळे बांगलादेशने या सामन्यात पुनरागमन केले.

पाकिस्तानचा पहिला डाव 274 धावांवर आटोपला. यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 26 धावांत 6 गडी गमावल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा लिटनने मेहंदी हसनसोबत 165 धावांची भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

मेहंदी हसनला बाद करून खुर्रम शहजादने ही भागीदारी तोडली. मेहंदी हसन बाद होण्यापूर्वीच लिटनने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले होते. यासह लिटन दास एका खास यादीत सामील झाला आहे. या खास यादीत एमएस धोनीचाही समावेश आहे. पाकिस्तानमध्ये शतक करणारा तो सहावा परदेशी यष्टीरक्षक ठरला आहे. 2022 मध्ये इंग्लंडच्या ओली पोपने शेवटच्या वेळी हा पराक्रम केला होता. 2006 मध्ये एमएस धोनीने फैसलाबादमध्ये 148 धावांची खेळी खेळली होती.

बांगलादेश संघ दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाकडे वाटचाल करत आहे. बांगलादेशला चौथ्या डावात 185 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. बांगलादेशनेही एकही बळी न गमावता 42 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावातही पाकिस्तानचा संघ 172 धावांत आटोपला. यासह पाकिस्तानला आता मालिकेत क्लीन स्वीपचा धोका आहे. बांगलादेश संघाने पहिला कसोटी सामना जिंकलेला. बांगलादेशने हा सामना जिंकल्यास पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी ते प्रथमच करतील. पाकिस्तान मागील 10 कसोटी सामन्यात एकही विजय मिळवण्यात अपयशी ठरेल.

हेही वाचा-

‘अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द उद्ध्वत करू नका’; योगराज सिंग यांच्यावर संतापले चाहते

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 वेगवान गोलंदाज, एकही भारतीय नाही
या बाबतीत जो रूट विराटपासून खूपच दूर; पाहा किंग कोहलीचा हा विश्वविक्रम!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---