विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघाची गाडी रुळावरून घसरताना दिसत आहे. कारण, पाकिस्तानने पराभवाची हॅट्रिक केली आहे. सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडलेल्या 22व्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. विश्वचषकातील अफगाणी सेनेचा हा दुसरा विजय आहे. या विजयासह अफगाणिस्तानने वनडे इतिहासात पहिल्यांदा पाकिस्तानला पराभूत केले. यापूर्वी त्यांना 7 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. अशात हा विजय अफगाणिस्तानसाठी ऐतिहासिक ठरला. पाकिस्तान पराभूत होताच भारतीय संघाचा स्टार खेळाडू इरफान पठाण याने राशिद खानसोबत धमाकेदार ठुमके लावले. तसेच, पाकिस्तानच्या 3 चुकाही सांगून टाकल्या.
इरफान-राशिदचा डान्स
अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभवाचा धक्का देताच भारतीय माजी खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण (Irfan Pathan) याने 2 वेळा राशिद खान (Rashid Khan) याच्यासोबत डान्स केला. झाले असे की, अफगाणिस्तानने विजय मिळवला, तेव्हा इरफान जतीन सप्रूसोबत समालोचन करत होता. त्याचवेळी विजयाचा जल्लोष करण्यासाठी राशिद संघासोबत मैदानाची चक्कर मारत होता. त्याचवेळी समालोचन करत असलेला इरफान पठाण आणि राशिद खान डान्स (Irfan Pathan And Rashid Khan Dance) करू लागले.
Irfanbhai dancing with Rashid Khan after victory against Pakistan.
– What a Moment 🔥💥#PAKvsAFG #AFGvsPAK #AFGvPAK
🎥 @IrfanPathan pic.twitter.com/B2nstCwgRU
— Ishan Joshi (@ishanjoshii) October 23, 2023
खरं तर, सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफानने सांगितले की, “मी राशिदला वचन दिले होते की, जर तुम्ही सामना जिंकण्यात यशस्वी झालात, तर मी डान्स करेल.” तसेच, राशिदही सामन्यापूर्वी म्हणाला होता की, “आम्ही या सामन्यात विजय मिळवणार आहोत.” राशिद म्हणाला, “हा आमच्या क्रिकेट इतिहासातील यादगार विजयांपैकी एक आहे. यापूर्वी आम्ही अनेकदा पाकिस्तानविरुद्ध विजयाच्या जवळ पोहोचलो होतो, पण विजय मिळवू शकलो नव्हतो.”
https://twitter.com/bashir_gharwall/status/1716499327957315759?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1716499327957315759%7Ctwgr%5E6b08bec4494d6448a8c37d1fffff093c826886a5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fcricket%2Fpakistan-hat-trick-defeat-in-world-cup-2023-irfan-pathan-danced-on-field-twice-with-afghanistan-rashid-khan-team-india-pak-vs-afg-7773759.html
पाकिस्तानच्या 3 चुका
पाकिस्तान पराभूत होताच इरफान म्हणाला की, “सामन्यात पाकिस्तानने एक नाही, तर 3 चुका केल्या. कर्णधार बाबर आझम सामन्यात पुनरागमनाची कला अजूनही शिकू शकला नाही. अफगाणिस्तानची दुसरी विकेट पडल्यानंतर त्याने फिरकीपटूंना गोलंदाजी दिली. यामुळे पुनरागमनाची जी संधी होती, ती संघाने गमावली. दुसरी बाब अशी की, सामन्यात अफगाणिस्तान संघ 4 फिरकीपटूंसोबत उतरला होता, तर पाकिस्तान फक्त 2. जरी तुमचे फिरकीपटू चांगली कामगिरी करत नसले, तरी चेन्नईत 3 फिरकीपटूंना संधी दिली पाहिजे होती. तिसरी चूक अशी की, त्यांचे वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने विकेट घेऊ शकत नाहीयेत. यामुळे फिरकीपटूंवर दबाव येत आहे.”
पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव
स्पर्धेविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तानने आधी नेदरलँड्सला पराभूत केले होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध विजय साकारला. मात्र, भारतीय संघाविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानची लय बिघडली. त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाने 62 धावांनी पराभूत केले आणि आता अफगाणिस्तानकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. अशाप्रकारे पाकिस्तानच्या पराभवाची हॅट्रिक झाली. (pakistan hat trick defeat in world cup 2023 irfan pathan danced on field twice with afghanistan Rashid Khan)
हेही वाचा-
‘अजय जडेजामुळे…’, अफगाणिस्तानच्या धमाकेदार विजयानंतर सचिन तेंडुलकरची रिऍक्शन व्हायरल
विजय एक, विक्रम अनेक! अफगाण सेनेनं उभारली रेकॉर्ड्सची भिंत, पाकविरुद्ध ‘असा’ पराक्रम करणारा जगातला पहिलाच संघ