---Advertisement---

पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांना युएईमध्ये जाहीर झाला मोठा क्रीडा पुरस्कार

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 1:08 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तानचा कारभार हाताळणारे पंतप्रधान इम्रान खान यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये त्यांची एमबीआर क्रिएटिव्ह स्पोर्ट्स अवॉर्ड अंतर्गत वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व म्हणून निवड झाली आहे. इम्रान यांना मिळालेल्या या पुरस्काराने पाकिस्तानातील खेळाचा स्तर उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

इम्रान खान यांनी १९९२ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देऊन जगभरात पाकिस्तानची खास ओळख निर्माण केली होती. हे विश्वचषक विजेतेपद जिंकून त्यांनी पाकिस्तानला जगातील अव्वल क्रिकेट राष्ट्रांपैकी एक म्हणून स्थापित करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती.

याशिवाय क्रीडा प्रशासक म्हणून देशातील खेळांना चालना देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आणि राजकारणात येण्यापूर्वी या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने क्रीडा प्रशासक म्हणून आपल्या देशात खूप काम केले. विशेषत: क्रिकेटच्या सुधारणेसाठी त्यांनी बरेच काम केले. सध्या ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत आणि आजही ते त्यांच्या देशातील अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत.

यूएईच्या अधिकृत वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मोहम्मद बिन राशिद अल मकतूम क्रिएटिव्ह स्पोर्ट्स अवॉर्ड्सची घोषणा मंगळवारी करण्यात आली. बक्षीस रकमेच्या बाबतीत हा पुरस्कार जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कारांमध्ये इम्रान खान व्यतिरिक्त कतार ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष शेख जोआन बिन हमद अल थानी यांची अरब देशांची क्रीडा व्यक्तिमत्व म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्कारांचा सत्कार समारंभ पुढील वर्षी ९ जानेवारी रोजी दुबई येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यर आधी कसोटी पदार्पण केलेेले ५ खेळाडू सध्या करतायेत तरी काय?

Video: गावसकरांच्या हस्ते पदार्पणाची कॅप मिळताच अय्यर भावूक, अशी राहिलीये मुंबईकर फलंदाजाची प्रथम श्रेणी कामगिरी

दर्जेदार! भारतात खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम ५ खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---