टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. ८ ऑगस्ट या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ध्वजवाहक बनत भारतीय तिरंगा फडकावला. त्याने या स्पर्धेच कांस्यपदक जिंकून भारतीयांची मान उंचावली. एक सुवर्ण पदकासह एकूण ७ पदके मिळवत भारताने या ऑलिम्पिक स्पर्धत ऐतिहासिक कामगिरी केली. एकीकडे भारतीय खेळाडूंचे संपूर्ण देशभरातुन कौतुक केले जात आहे. तर शेजारील राष्ट्राच्या माध्यमांवर आपल्याच खेळाडूंची थट्टा उडवली जात आहे.
भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचा शेवट ४८ व्या क्रमांकावर केला. तर अमेरिकेने ११३ पदक मिळवत या यादीत सर्वोच्च स्थान गाठले. तसेच चीनने ८८ पदक मिळवत या यादीत दुसरे स्थान गाठले. तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानला एकही पदक मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि व्हिडीओ शेअर करून त्यांची थट्टा उडवली जात आहे. (Pakistani media making fun of their own country after poor performance in tokiyo olympics,watch video)
अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी दिग्गज खेळाडू वासिम अक्रम आणि निवेदिका आपल्याच खेळाडूंची थट्टा उडवताना दिसून येत आहे. हा एक जुना व्हिडीओ आहे. ज्यामध्ये वासिम अक्रम हसताना दिसून येत आहे. तर होते असे की, निवेदक आशिया स्पर्धेत घडलेला एक किस्सा सांगतो.
तो म्हणतो की,”अशा स्पर्धेत जेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना पदक मिळवण्यात अपयश येते तेव्हा मायदेशात परतल्यानंतर प्रश्न उत्तरांचे एक सत्र होते. ज्यामध्ये जलतरण प्रशिक्षक ख्वाजा असलम यांना प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी म्हटले की,देवाचे आभार माना की कोणीही बुडले नाही.”
… और उधर पाकिस्तान में! pic.twitter.com/TH2hoLBsr0
— Rajiv (@Rajlko) August 8, 2021
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी
यावेळी देखील ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तान संघाला पदक मिळवण्यात अपयश आले आहे. परंतु भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा सह पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीमने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, त्याला पदक मिळवून देण्यात अपयश आले.
महत्वाच्या बातम्या –
टोकियो वारी संपवून घरी परतल्यानंतर मिळाले बहिणीच्या निधनाचे वृत्त, ढसाढसा रडली ‘ही’ भारतीय ऍथलिट
WTC पाँईट टेबल: पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने टीम इंडियाचे ‘मोठे’ नुकसान, वाचा सविस्तर
काळीज तोडणारा क्षण! बार्सिलोना क्लबचा निरोप घेताना मेस्सीला अश्रू अनावर, खूप रडला