fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुंबईला इंडियन्सला दुसरा झटका, तब्बल ५कोटी रुपये मोजलेल्या खेळाडूची माघार!

मुंबई | मुंबई इंडियन्स संघामधला पॅट कमिन्स हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईकडून मिळालेल्या पराभवानंतर मुंबईला हा दुसरा झटका बसला आहे.

पॅट कमिन्स कंबरेच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र आता दुखापत वाढल्यामुळे त्याने आयपीएल २०१८मधून माघार घेतली आहे.

दरम्यान, पॅट कमिन्स हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तर त्याला आराम करण्यासाठी सांगितले आहे.

आता मुंबई संघाच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमरा, मुस्ताफिझूर रेहमान, बेन कटिंग, मिचेल मॅक्लेघन यांच्यावर असणार आहे.

कोलकाता नाईट राइडर्स आणि दिल्ली डेयरडेविल्सकडून यापुर्वी खेळलेल्या कमिन्सला IPL 2018 साठी मुंबई फ्रंचाइजीने तब्बल 5.4 कोटी रुपये मोजले होते.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना पॅट कमिन्सने २२ विकेट घेतल्या होत्या. याच दरम्यान त्याला ही दुखापत झाली होती.

You might also like