fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पुणे मॉन्सून अश्वशर्यती हंगाम 2019: किंग्समन, प्रिंसेस ऍनाबेल यांनी आजचा दिवस गाजवला

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत सर्वात फेव्हरेट घोडा असलेल्या किंग्समन या घोड्याने 1400मीटर अंतरावरच्या द जे ई ह्युजेस ट्रॉफी या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. तर, द ऑगस्ट हँडीकॅप या महत्वाच्या लढतीत प्रिंसेस ऍनाबेल या घोड्याने विजेतेपद मिळवले.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी द जे ई ह्युजेस ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत जे.एम.लाईव्हस्टोक प्रायव्हेट लिमिटेडचे जयदेव मोदी, स्ट्राईड लाईव्हस्टोक प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ राम श्रॉफ व राज श्रॉफ आणि मंजिरी हॉर्स ब्रीडर्स फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर व मिसेस शापुर पी.मिस्त्री यांच्या मालकीच्या किंग्समन या घोड्याने 1मिनिट 26 सेकंद आणि 65 मिनिसेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. याचा जॉकी यश नरेदू आणि दीपेश नरेदू हा प्रशिक्षक होता.

द ऑगस्ट हँडीकॅप या महत्वाच्या लढतीत गौरव सेठी, अभिमन्यू ठाकरसी, शुभा सेठी, कनिका कोछर आणि चिराग पिटीज यांच्या मालकीच्या प्रिंसेस ऍनाबेल या घोड्याने 1मिनिट 26 सेकंद व 652 मिनिसेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले. याचा भवानी सिंग हा जॉकी होता आणि अल्तमेश अहमद हा प्रशिक्षक होता.

सविस्तर निकाल

द स्ट्रॅटेजिक मूव्ह प्लेट क्लास IV
विजेता-एडेले, उपविजेता-झोझो;

द ए जे वाडिया प्लेट-डिव्हिजन 2
विजेता-रेड फायर, उपविजेता-लिलीबेथ

द जे ई ह्युजेस ट्रॉफी
विजेता-किंग्समन, उपविजेता-वेलेरिओ

द गुडनेस ग्रेशियस प्लेट
विजेता-हेडवे, उपविजेता-जेटफायर;

द ऑगस्ट हँडीकॅप
विजेता-प्रिंसेस ऍनाबेल, उपविजेता-मिझिलकाझी;

द ए जे वाडिया प्लेट-डिव्हिजन 1
विजेता-हायलँड दास, उपविजेता-ओस्पिशियस

You might also like