fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या नयनची सुवर्णपदकाची कमाई

सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत अनिरुद्ध, शिफा शेखला रौप्यपदक

पुणे | तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ व्या स्पारिंग व ८ व्या पुमसे राष्ट्रीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत ३५ वर्षांखालील मुलींच्या वजनी गटात महाराष्ट्राच्या नयन बारगजे हिने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर अनिरुद्ध बांदल, शिफा शेख यांनी रौप्यपदकाची कमाई केली.

खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील ३५ वर्षांखालील वजनी गटात महाराष्ट्राच्या नयन हिने सुवर्णपदक मिळवले. बिहारच्या महिमा कुमारी बस्कीने रौप्यपदक, तर राजस्थानच्या रुचिका चतुवेर्दी आणि दिल्लीच्या सिया मिश्रा यांनी ब्राँझपदक मिळवले.

स्पर्धेतील ३२ वर्षांखालील मुलांच्या वजनी गटात महाराष्ट्राच्या अनिरुद्ध बांदलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चंडीगडच्या रवी घारतीने सुवर्णपदक मिळवले. उत्तर प्रदेशच्या क्षीतिज तिवारी आणि आसामच्या थुलेन सैकियाने ब्राँझपदकाची कमाई केली. मुलींच्या वैयक्तिक पूमसे प्रकारात ओडिशाच्या मधुस्मिता मोहंतीने सुवर्णपदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या शिफा शेख हिला मागे टाकले.

शिफाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आसामच्या स्तुती मझुमदार आणि दीपल गजेराला ब्राँझपदक मिळाले.

निकाल : १८ वर्षांखालील मुली : आस्था जोशी (उत्तराखंड), तनिषा (चंडीगड), याना सॉय (झारखंड), नेलसिया अँथसिया (कर्नाटक). २३ वर्षांखालील मुले : अमन पांडे (उत्तराखंड), तोंदोन्बा सिंह (मणिपूर), प्रशांत प्रजापती (उत्तर प्रदेश), महंमद रेहान (राजस्थान). वैयक्तिक पूमसे : मुले – तुष्णिक भुयान (आसाम), ए. पृथ्वीराज (मणिपूर), सी. प्रधान (सिक्कीम), ध्येय पनसुरिया (गुजरात). मिश्र दुहेरी पूमसे : सी. प्रधान आणि कृतिका प्रधान (सिक्कीम), तुष्णिक भुयान – स्तुती मझुमदार (आसाम), दीपल गजेरा – ध्येय पनसुरिया (गुजरात), ए. पृथ्वीराज – मार्टिना वाहेनगबाम (मणिपूर). सांघिक पूमसे : मुले – आसाम (तुष्णिक भुयान, के. गोस्वामी, निशांतसिंग हझारी), मणिपूर (ए. पृथ्वीराज, लिओकांतसिंग, प्रितन मेतेई), महाराष्ट्र (हरेहान वांकावाल, अर्णव अत्रे, जयवीर कोच्चर), ओडिशा (अतिथ्य बिशॉय, पीयूष सारंगी, सुभ्रांसू परिदा). मुली – सिक्कीम (कृतिका प्रधान, अनुष्का सुब्बा, यांगझी तमांग), गुजरात (ग्रेसी कोलाडिया, दीपल गजेरा, जिया भलोडी), महाराष्ट्र (श्रद्धा सुत्र, पृथ्वीराज शेलार, अनुष्का गमारे), मणिपूर (लिंथोई पोतशांगबाम, मार्टिना, रोसी चानू).

You might also like