पुणे। पुणे डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित पाचव्या राज्यस्तरीय डॉक्टर्स प्रीमियर लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत पुणे वॉररिअर्स व मामू मुंबईकर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नेहरू स्टेडीयम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत चेतन पटेलच्या अफलातून अचूक गोलंदाजीच्या बळावर पुणे वॉररिअर्स संघाने नाशिक मास्टर्स संघाचा 30 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना अबिद शेखच्या 56 व साईनाथ गायकवाडच्या 49 धावांसह पुणे वॉररिअर्स संघाने 15 षटकात 5 बाद 140 धावा केल्या.
140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेतन पटेल व विनोद कांबीरे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे नाशिक मास्टर्स संघाचा डाव 15 षटकात 9 बाद 110 धावांत गारद झाला. यात मिलिंद गांगुर्डेने 47 धाव करून संघाच्या डावाला आकार दिला.9 धावत 4 गडी बाद करणारा चेतन पटेल सामनावीर ठरला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अमित जगतापच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मामू मुंबईकर संघाने मुंब्रा मेडिकोस संघाचा 3 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
उपांत्य फेरी ।
पुणे वॉररिअर्स। 15 षटकात 5 बाद 140 धावा (अबिद शेख 56(44),साईनाथ गायकवाड 49(31), विनोद कांबीरे नाबाद16(8), राज चोपडा 2-26) वि वि नाशिक मास्टर्स: 15 षटकात 9 बाद 110 धावा(मिलिंद गांगुर्डे 47(23),दिनेश ठाकूर 17(13), चेतन पटेल 4-9, विनोद कांबीरे 2-35) सामनावीर- चेतन पटेल
पुणे वॉररिअर्स संघाने 30 धावांनी सामना जिंकला
मुंब्रा मेडिकोस। 15 षटकात 8 बाद 105 धावा (मंथन पांचाळ 44(31), अमित जगताप 3-4, असीम 2-11) पराभूत वि मामू मुंबईकर : 14.5 षटकात 7 बाद 107 धावा (जितेंद्र पवार नाबाद 28(24), मुनीब हर्णेकर 17(11), संदीप पाटील 16(21), तौसिफ़ खान 3-10, अफाशीर खान 2-18)सामनावीर- अमित जगताप
मामू मुंबईकर संघाने 3 गडी राखून सामना जिंकला .