पुणे। कटकमधील 21 व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये नुकतेच हरमीत देसाई यांना यूटीटीच्या सीझन 3 साठी पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले होते. अलीकडे कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या एकेरीमध्ये अयीखा मुखर्जी आणि हरमीत देसाईने सुवर्णपदक जिंकले आहे.
चुआंग चिह-युआन, सध्याचा जागतिक क्रमांक २८ चा खेळाडू आहे. त्याचे कौशल्य संघाचे बळ वाढवेल. पुणेरी पलटण टेबल टेनिस संघ भारतीय, तरुण आणि परदेशी खेळाडूंसह संतुलित संघ आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक फ्रांसिस्को सॅंटोस हे अनुभवी प्रशिक्षक आहेत आणि मागील हंगामात यूटीटीमध्ये प्रशिक्षण करत होते. पराग अग्रवाल टीमचे सहायक प्रशिक्षक आहेत. पुणेरी पलटण टेबल टेनीसच्या पहिल्या सामन्याचे प्रक्षेपण आज, २५ जुलै संध्याकाळी ७ वाजल्या पासून स्टार स्पोर्ट्स वर होईल.
पुणेरी पलटण टेबल टेनीसचे कर्णधार हरमीत देसाई मनोगत व्यक्त करत बोलले, “पुणेरी पलटण टेबल टेनिस हा यूटीटी मधील एक नवीन संघ आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मी टीम व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो आणि ही जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन. आम्ही या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करू आणि टेबल टेनिसच्या विश्वात पुण्याचे नाव बनवू.”
या प्रसंगी बोलताना कैलाश कांडपाल, सीईओ इंशुरकोट स्पोर्ट्स प्रा. लि. हे म्हणाले, “पुणेरी पलटण टेबल टेनीस हा संघ अल्टीमेट टेबल टेनिसमध्ये पदार्पण करीत आहे. हरमीत संघाचे नेतृत्व करेल आणि मला खात्री आहे की तो कर्णधारपदी चांगली कामगिरी करेल. हरमीत, अयीखा, चुआंग चिह-युआन आणि सबिनअसे सिनिअर खेळाडूंचा अनुभव आम्हाला उपयोगी ठरेल. आमचे तरुण खेळाडू, रोनित आणि सेलेना हे देखील प्रतिभावान खेळाडू आहेत.”