आपण पाहिले आहे की, अधिकतर क्रिकेटपटू अभिनेत्री किंवा मॉडेल्सच्या प्रेमात पडतात. याची उदाहरणेही कमी नाहीत. भारतीय क्रिकेट संघातच असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे अभिनेत्रींच्या प्रेमात पडले. त्यातील काहींची प्रेमकहानी लग्नापर्यंत जाऊन संपली, तर काहींची अधुरी राहिली.
पण, दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेटपटू कोणत्या अभिनेत्री, मॉडेल किंवा त्याच्या नात्यातील व्यक्तिच्या नव्हे तर एका चीयरलीडरच्या प्रेमात पडला होता आणि शेवटी त्याने तिच्यासोबत लग्न केले. हा क्रिकेटपटू म्हणजे कर्णधार क्विटंन डी कॉक होय. Quitnton De Kock And Wife Shasha Hurly Love Story
https://www.instagram.com/p/Bz50u6DHfYS/
डी कॉक आणि त्याची पत्नी साशा हर्ली यांची प्रेमकहानी कोणत्या चित्रपटाच्या कहानीपेक्षा कमी नाही. यांच्या प्रेमकहानीची सुरुवात इथे तिथे कुठे नाही, तर क्रिकेट स्टेडियममध्ये झाली होती. २०१२ साली दक्षिण आफ्रिका देशांतर्गत संघ आणि आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघादरम्यान टी२० चॅम्पियन्स लीगचा एक सामना खेळण्यात आला होता. त्यावेळी डी कॉक हा दक्षिण आफ्रिकाचा देशांतर्गत संघ हायवेल्ड लायन्स संघाचा खेळाडू होता. विशेष म्हणजे, त्यांनी ७ चेंडू राखून ८ विकेट्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते.
या सामन्यात डी कॉकने नाबाद ५१ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. यावेळी साशा ही सामन्यादरम्यान क्रिकेटपटूंना चीयर करणाऱ्या मुलींपैकी एक होती. त्या सामन्यातील विजयानंतर साशाने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन डी कॉकला शुभेच्छा दिल्या होत्या. तिथून त्यांच्या प्रेमकहानीची सुरुवात झाली.
https://www.instagram.com/p/BUEy75Rhto5/
पुढे एकमेकांना तब्बल ३ वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी २०१५साली साखरपुडा केला. त्यानंतर डी कॉकने साशाला ख्रिसमसच्या दिवशी मर्सिडिज कार भेट म्हणून दिली. अखेर १९ सप्टेंबर २०१६ला ते दोघे लग्नबंधनात अडकले.
https://www.instagram.com/p/BNw3gprjGmp/
महत्त्वाचे म्हणजे, ज्या डी कॉकने वयाच्या जवळपास २०व्या वर्षी आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तोच डी कॉक आता मुंबई संघाचा प्रमुख खेळाडू आहे. २०१९सालच्या आयपीएल खेळाडू लिलावात मुंबईने त्याला आपल्या संघात घेतले होते. पूर्ण हंगामात त्याने १६ सामने खेळत ५२९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल
अखेर इंग्लंड विश्वविक्रम करण्यापासून थोडक्यात चुकले, नाहीतर…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल