नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघात सध्या अष्टपैलू रवींद्र जडेजाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक खेळाडू समजले जाते. जडेजाने बाऊंड्री लाईनवरून केलेला थ्रो देखील स्टंपवरील बेल्स उडवत फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवतो. तरीही येत्या काळात त्याच्यासारखा दुसरा कोणता असा खेळाडू असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तरीही, आयपीएलमधील फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी खुलासा केला आहे की, राहुल द्रविडचा असा विश्वास आहे की कमलेश नागरकोटी असा खेळाडू आहे, जो एक दिवशी क्षेत्ररक्षणात जडेजालाही टक्कर देईल.
सांगितले जबरदस्त खेळाडू
वेंकी म्हैसूर यांनी म्हटले की, युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीकडून आयपीएलच्या १३ व्या हंगामात खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या मते, नागरकोटीची प्रशंसा द्रविडने केली होती. यावरून समजते की तो कोणत्या स्तरावरील खेळाडू आहे.
ते म्हणाले, “एक खेळाडू ज्याला आपण ऍक्शनमध्ये पाहायला खूप उत्सुक आहोत, तो आहे कमलेश नागरकोटी. तो एक जबरदस्त खेळाडू आहे आणि माझ्या मुलाप्रमाणे आहे. ज्या लोकांनी त्याला गोलंदाजी करताना पाहिले आहे, त्यांना माहीत आहे की तो किती वेगाने गोलंदाजी करतो. सोबतच तो फलंदाजी करण्यातही सक्षम आहे.”
द्रविडने केली होती प्रशंसा
याव्यतिरिक्त वेंकी यांनी खुलासा केला की, द्रविडनेही नागरकोटीची प्रशंसा केली होती तसेच त्याला भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता, “नागरकोटी जडेजा सारख्या खेळाडूलाही क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत टक्कर देऊ शकतो.” वेंकी यांच्यानुसार, द्रविडसारख्या दिग्गजाचे असे म्हणणे कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठी बाब आहे.
२०१८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा होता भाग
कमलेश नागरकोटी २०१८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने त्यावेळी चांगली कामगिरी केली होती. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. केकेआर संघाने त्याला २०१८ च्या लिलावात ३.२० कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. तरीही, दुखापतीमुळे तो आयपीएलच्या २०१८ आणि २०१९ या दोन्ही हंगामात भाग घेऊ शकला नव्हता.
त्याने घरगुती क्रिकेटमध्ये अ दर्जाचे ९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६.२० च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-निवृत्तीनंतर सुरेश रैना करणार हे काम ; जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना लिहिले पत्र
-व्हिडिओ: पाकिस्तानच्या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर उगारली बॅट
ट्रेंडिंग लेख-
-ज्या ऑस्ट्रेलियामुळे विश्वचषक खेळता आला नाही त्यांनाच फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवणारा क्रिकेटर
-कसोटी कारकिर्दीत दोन वेळा त्रिशतक करणारे फलंदाज
-मॅगी खायलाही एकवेळ तरसणारा क्रिकेटर आज आहे मुंबई इंडियनस्च्या टॉप प्लेअर