सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेतील एलिट गटातील सामना मुंबई विरुद्ध तमिळनाडू संघात 3 जानेवारीपासून खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज सरफराज खान याने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा दम दाखवून दिला आहे. त्याने मुंबई संघासाठी आणखी एक शतक झळकावले आहे. त्याने तमिळनाडूविरुद्ध शंभराहून अधिक चेंडूंचा सामना करत शतक साजरे केले. विशेष म्हणजे, हे त्याचे 12वे प्रथम श्रेणी शतक ठरले.
सरफराज खानने रणजीत ठोकले शतक
झाले असे की, मुंबई संघाचा युवा फलंदाज सरफराज खान याने तमिळनाडूविरुद्ध वेगवान शतक झळकावले. त्याने 128 चेंडूंचा सामना करत शतक साजरे केले. विशेष म्हणजे, हे त्याचे या हंगामातील दुसरे शतक ठरले. आपला 35वा प्रथम श्रेणी सामना खेळत असलेल्या सरफराज याने या क्रिकेट प्रकारात आतापर्यंत 3200हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
Sarfaraz Khan in this Ranji trophy so far – 126*(161), 75(121), 20(45), 162(220).#sarfarazkhan pic.twitter.com/tY9KDN4XPo
— aman mishra (@Amanm5744) January 4, 2023
सरफराजनेही ठोकली भारतीय संघासाठी दावेदारी
मुंबई विरुद्ध तमिळनाडू (Mumbai vs Tamilnadu) संघात खेळल्या जात असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडू संघाने 36.2 षटकात 144 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, मुंबईकडून खेळताना सरफराज खान आणि तनुष कोटियन यांनी सर्वाधिक धावांची बरसात केली. सरफराजने यादरम्यान 220 चेंडूत 162, तर तनुषने 114 चेंडूत 71 धावांचे योगदान दिले. 104 षटकांनंतर मुंबईने 9 विकेट्स गमावत 475 धावा केल्या. खेळपट्टीवर मोहित अवस्थी (68) आणि सिद्धार्थ राऊत (30) खेळत होते.
सरफराज खान याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी ही तब्बल 77.43 इतकी आहे. ही आकडेवारी निवडकर्त्यांना आकर्षित करत आहे. रणजी ट्रॉफीच्या या हंगामात सरफराजचे प्रदर्शन प्रशंसनीय आहे. त्याने हैदराबादविरुद्ध नाबाद 126 धावांची खेळी केली होती. तसेच, त्याने सौराष्ट्रविरुद्धही 75 धावा चोपल्या होत्या. अशात त्याने या प्रदर्शनाने भारतीय संघात एन्ट्री करण्याचा दावा ठोकला आहे. आता त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ranji trophy mumbai vs tamilnadu cricketer sarfaraz khan another century from mumbai team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रेयसला कर्णधार बनवण्यासाठी आणखी एक माजी क्रिकेटपटू आग्रही; म्हणाला…
कधीकाळी क्रिकेटसाठी वडिलांच्या शिव्या खात मावी; द्रविडच्या ‘त्या’ शब्दांनी बदलले आयुष्य