भारतीय संघाचे माजी प्रशिक्षर रवी शास्त्रींना असे वाटते की, टी-२० क्रिकेट हे दोन देशांतील द्विपक्षीय मालिकांसाठी नाहीये. त्यांच्या मते टी-२० क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त विश्वचषकात खेळले गेले पाहिजे. भारत आणि दक्षिण आफ्रिकी यांच्यात मायदेशातील टी-२० मालिका लवकरच सुरू होईल, यापूर्वी शास्त्रींनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते टी-२० क्रिकेट फुटबॉलप्रमाणे झाले पाहिजे, ज्याठिकाणी आंतरराष्ट्रीय पेक्षा फ्रँचायझींना अधिक महत्व आहे.
शास्त्री म्हणाले की, “टी-२० क्रिकेटमध्ये खूप द्विपक्षीय क्रिकेट होत आहे. मी हे आधीही म्हटलो आहे, तेव्हा देखील, जेव्हा मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होतो. हे माझ्या समोर होत होते. हे (टी-२०) फुटबॉलप्रमाणे झाले पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही फक्त विश्वचषक खेळता. द्विपश्रीय मालिकांना याठिकाणी कोणीच लक्षात ठेवत नाही.”
शास्त्रींनी पुढे बोलताना असेही सांगितले की, मागच्या ६ ते ७ वर्षांमध्ये दोन विश्वचषक सोडले, तर त्यांना एकही टी-२० सामना लक्षात नाहीये. ते म्हणाले की, “एक संघ विश्वचषक जिंकतो, तो हे लक्षात देखील ठेवतो. दुर्दैवाने आपण हे लक्षात ठेवत नाही, त्यामुळे मलाही हे लक्षात नाहीये. जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळले जात आहे. प्रत्येक देशाला त्यांचे फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे, जे त्यांचे देशांतर्गत क्रिकेट आहे आणि तुम्ही दोन वर्षांमध्ये एक विश्वचषक देखील खेळू शकता.”
आयपीएलच्या भविष्याविषयी बोलताना आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते पुढच्या काही वर्षांमध्ये आयपीएल वर्षातून एकदा नाही, तर दोन वेळा आयोजित केली जाऊ शकते. आकाश चोप्रा म्हणाला की, “मला वाटते की, भविष्यात प्रत्येक कॅलेंडर वर्षात आयपीएलचे दोन हंगाम होऊ शकतात आणि ही गोष्ट जास्त लांब नाहीये.” शास्त्रींनी देखील चोप्राच्या या वक्तव्याला समहती दर्शवली. शास्त्री म्हणाले की, “पुढच्या काळात हे होऊ शकते. १४० सामन्यांना ७०-७० मध्ये वाटले गेले पाहिजेत, दोन हंगामांमध्ये. आपण आता काहीच सांगू शकत नाही.”
रवी शात्री हे भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात भारताने मायदेशात आणि विदेशात अनेक मालिका जिंकल्या, पण एखादा विश्वचषक मात्र जिंकता आला नाही. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर पडला आणि शास्त्रींचा संघासोबतचा करार देखील संपला. सध्या ते पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ ३ भारतीय त्रिमूर्तींचं करिअर संपलं का?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा टी२० सामना होणार रद्द?, धक्कादायक कारण आलं समोर
‘त्यानेही तेच केले, जे मी केले असते’, वनडेत त्रिशतक ठोकणाऱ्या भारतीय दिग्गजाकडून संजूचं कौतुक