काही दिवसांपूर्वी विराट कोहली याला( Virat Kohli) भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते आणि ही जबाबदारी रोहित शर्मा याला (Rohit Sharma) देण्यात आली होती. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, तर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील याबाबत आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Ravi Shastri statement on Virat Kohli and Rohit Sharma captaincy)
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रमात म्हटले की, “वनडे आणि कसोटी संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार असणे योग्य निर्णय आहे. हे विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी संकटात संधी मिळण्यासारखं झालं आहे. कारण कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे एका खेळाडूला तीनही संघाचे नेतृत्व करताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण बायो बबलमध्ये राहणं कुठल्याही खेळाडूसाठी सोपं नाहीये.”
तसेच रवी शास्त्री पुढे म्हणाले की, “वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढल्यानंतर आता विराट कोहली पूर्णपणे कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकतो. आता त्याला हवं तोपर्यंत तो संघाची जबाबदारी पार पाडू शकतो. वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो आता आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. तो आणखी ५ तर ते ६ वर्ष क्रिकेट खेळू शकतो.”
अधिक वाचा – रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार
विराट कोहलीची वनडे संघाचा कर्णधार म्हणून कारकीर्द
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ पैकी १५ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. यापैकी मायदेशात त्याने ९ पैकी ८ मालिका आपल्या नावावर केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन २-१ वनडे मालिकेत विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेत ५-१ ,वेस्ट इंडीजमध्ये ३-१ ने विजय मिळवला. तसेच न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेशमध्ये जाऊन देखील विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले.
महत्वाच्या बातम्या :
अंडर १९ असो नाहीतर राष्ट्रीय संघ, ‘या’ कर्णधारांनी नेहमीच दाखवला जलवा
गांगुली की धोनी? सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर भज्जी म्हणाला…
हे नक्की पाहा : ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’ |