पहिल्या कसोटीत नडणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाने पराभवाचं पाणी पाजलं आहे. पाच दिवसांच्या कसोटी मालिकेत दोन डाव खेळूनही ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला. भारताने हा सामना एक डाव आणि 132 धावांनी खिशात घातला. भारताच्या या विजयात फिरकीपटूंनी सर्वाधिक योगदान दिले. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या फिरकीपुढे पाहुण्या संघाच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. मात्र, जडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल हे या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा याला चांगलाच त्रास देत होते. याचा खुलासा स्वत: रोहितने सामन्यानंतर केला आहे.
तिन्ही खेळाडू मागत होते गोलंदाजी
सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इरफान पठाण (Irfan Pathan) याच्याशी बोलताना सामन्यादरम्यानच्या घटनेचा खुलासा केला. तो म्हणाला की, “या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळत होती. आमचे तिन्ही फिरकीपटू शानदार गोलंदाजी करत होते. अशात तिघांनाही सांभाळणे खूपच कठीण होत होते. कारण, तिघेही मला येऊन षटक मागत होते.” रोहितने सांगितले की, “तिघांचे म्हणणे होते की, ते विक्रमाच्या जवळ आहेत. त्यामुळे त्यांना गोलंदाजी दिली पाहिजे. जेणेकरून त्यांना विक्रम पूर्ण करता येईल. अशात कुणाला चेंडू सोपवायचा आणि कुणाला नाही, हे खूपच कठीण झाले होते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “कुणी 400 विकेट्स घेतल्या, कुणी 250 विकेट्सच्या जवळ पोहोचलत आहे. अशात सर्वजण म्हणत होते की, गोलंदाजी करू दे.” रोहितने सांगितले की, “मी विक्रमाकडे एवढं लक्ष देत नाही. मात्र, ही समस्या फक्त या कसोटी सामन्याची नाहीये. माझे गोलंदाज मला वनडे आणि टी20तही असेच म्हणतात.”
इरफान आणि रोहितमधील संभाषणाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण, भारताच्या विजयात या तिन्ही फिरकीपटूंचे सर्वात जास्त योगदान राहिले. अक्षरने फक्त एकच विकेट घेतली असली, तरीही त्याने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघ चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.
A conversation you can't miss between Rohit Sharma and Irfan Pathan 😂❤️@ImRo45 @IrfanPathan https://t.co/VV1w01QcJD
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) February 11, 2023
https://twitter.com/emotionhitman45/status/1624350760329961472
तिन्ही फिरकीपटूंनी घेतल्या 17 विकेट्स
संपूर्ण सामन्यात आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी मिळून 16 विकेट्स घेतल्या. अश्विनने 8, जडेजाने 7 आणि अक्षरने 1 विकेट नावावर केली. या सामन्यात या तिन्ही गोलंदाजांनी एकूण 17 विकेट्स घेतल्या. यामुळेच भारतीय संघाने तीन दिवसात सामना खिशात घातला.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना नागपूर येथे 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाणार आहे. (ravindra jadeja R ashwin axar patel was fighting with rohit sharma for bowling see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?
भारताच्या विजयांमध्ये सर्वात मोठे योगदान अश्विनचेच, भज्जी अन् झहीर खान तर लईच लांब