fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सुशांत सिंग आत्महत्येवरुन सुरु असलेल्या वादात शोएब अख्तरची उडी, म्हणे सलमान खान…

Regret not talking to Sushant Singh Rajput: Shoaib Akhtar

मुंबई । बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी आपल्या घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सुशांत सिंग विषयी एक मोठे विधान केले आहे.

2016 साली शोएब अख्तरने भारतात आल्यानंतर सुशांतला पाहिले होते. त्यावेळी शोएब अख्तरला सुशांतमध्ये आत्मविश्वास दिसला नाही. शोएब अख्तर म्हणाला की, “त्यावेळी सुशांतने रडून त्याच्या आयुष्यात आलेले अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला हवे होते.”

आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना शोएब म्हणाला की, “भारतातून परत जाताना मुंबई येथील एका हॉटेलमध्ये सुशांतला भेटलो होतो. मी प्रामाणिकपणे सांगतो त्याच्याकडे आत्मविश्वास दिसत नव्हता. माझ्या समोरून तो मान खाली घालून निघून गेला माझ्या मित्राने मला सांगितले की,त्याने एमएस धोनीच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केली आहे.”

“त्यावेळी मला असे वाटले की, त्याचा अभिनय पाहायला हवा. तो खूपच विनम्र दिसून आला. एक चांगला चित्रपट बनवला होता. यात तो यशस्वीही झाला. सुशांत माझ्यासोबत बोलला नाही याचे दुःख देखील आहे. मी त्याला माझे अनुभव सांगितले असते,” असे शोएब अख्तरने सांगितले.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. यात सलमान खान खूप ट्रोल होत आहे. शोएब अख्तरने सलमान खान आणि अन्य बॉलिवूडच्या सेलिब्रिटींवर लावण्यात आलेल्या आरोप म्हणाला की, “पुराव्याविना कुणावरही आरोप करणे चुकीचे आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी – 

अखेर फाफ डुप्लेसीने केला धोनीच्या सीएकेच्या ड्रेसिंगरुममधील ‘त्या’ वातावरणाचा खुलासा

क्रिकेट जगतावार राज्य करणाऱ्या धोनी- कोहलीचे बोर्डाच्या परिक्षेत आले होते असे मार्क्स

वीरेंद्र सेहवागच्या घरावर आले टोळधाडीचे संकट, खुद्द सेहवागनेच शेअर केला व्हिडिओ

You might also like