दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेला आजपासून (९ जून) सुरुवात होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रिषभ पंत करणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या पंतची या मालिकेत कसोटीच असणार आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सांभाळणारा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले. पंतला दिलेल्या जबाबदारीने त्याची गर्लफ्रेंड आनंदी झाली असून तिने सोशल मीडियावर स्टोरीही पोस्ट केली आहे.
इशा नेगीने तिच्या इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरील स्टोरीमध्ये थॅंकफूल, ग्रेटफूल आणि आनंदी वाटत आहे असे लिहीले आहे. ही स्टोरी रिषभला कर्णधार म्हणून घोषित केले त्याच्या ताबडतोब नंतर तिने पोस्ट केली आहे.
इशा-रिषभ मागील खूप दिवसांपासून एकमेकांना डेट्स करत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दिल्ली संघाचे रिषभने नेतृत्व केले आहे. त्यावेळी अनेक सामने पाहण्यासाठी ती स्टेडियममध्ये दिसली आहे. तेथील तिचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.
उत्तराखंड येथे जन्मलेल्या रिषभचे बालपण आणि क्रिकेटचा सराव दिल्लीतच झाला आहे. त्याने प्रथम श्रेणीचे सामनेही दिल्ली संघाकडून खेळले आहेत. २०२२च्या आयपीएल हंगामात दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यावर त्याला आता भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
बाहेरील देशात कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिषभने किशोरवयात क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी अनेक शहरे फिरली आहेत. तो तरूण वयात दिल्लीकडून राजस्थानकडे गेला, तर परत दिल्ली संघात आगमन केले. यादररम्यान त्याला क्रिकेट अकॅडमीमधून बाहेरही काढण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रिषभ कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. ही टी२० मालिका ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी महत्वाची असणार आहे. यामुळे भारतीय संघातील सर्वच खेळाडू उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून त्यादिवशी विराट कोहली रडला होता,’ संघ सहकाऱ्याचे स्पष्टीकरण
उमरान की अर्शदीप, कोणाला द्यावी संधी?, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा पंतला सल्ला
‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळलेत आयपीएल, जाणून घ्या एका क्लिकवर