---Advertisement---

Video: जेव्हा पंत, स्टॉयनिसने काढली रिकी पाँटिंगची खोड, पुढे काय झालं पाहा

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 10:07 AM
---Advertisement---

फलंदाजांच नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने आले होते. सामन्यादरम्यान दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग समालोचकांना मुलाखत देत असताना, रिषभ पंतने त्यांची नक्कल केली. यावेळी त्याला दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिसनेही यात साथ दिली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि दिल्लीपुढे १७९ धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. तर पावरप्ले संपायच्या आतच अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने ८ धावांवर त्याची विकेट गमावली. एवढेच नाही तर, ११.३ षटकात ड्वेन ब्रावोने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला फाफ डू प्लेसिसच्या हातून झेलबाद केले.

अशात पाँटिंग सामन्यादरम्यान समालोचकांना मुलाखत देत असताना, कोणत्याही संघाने आव्हानाचा पाठलाग करताना अंतिम षटकात विकेट्स न गमावण्याचे महत्त्व किती असते, याविषयी बोलत होता. तेवढ्यात नकळत पंत पाँटिंगच्या मागे येऊन उभा राहिला आणि त्यांच्या बोलण्याची मिमिक्री (नक्कल) करु लागला. यावेळी त्याला मागून स्टॉयनिसही साथ देत होता.

पाँटिंगला लवकर ही गोष्ट लक्षात आली नाही. पण समालोचकाने बोलताना त्यांना पंतबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले आणि नंतर तो हसू लागला.

https://twitter.com/Kourageous__/status/1317505469238358016?s=20

https://twitter.com/Aditya_P1122/status/1317525192231415809

पंतला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या हंगामातील २३व्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या २ सामन्यांपासून त्याला संघाबाहेर बाहेर राहावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ-मोठ्या गोलंदाजांची चिरफाड करणारा संजू सॅमसन ‘या’ गोलंदाजापुढे होतो गपगार

ठरलं तर! ‘या’ तारखेपासून भारतात होणार देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात; गांगुलीची घोषणा

‘तो कोरोनाची लस देखील बनवेल,’ तेवतियाचं मन जिंकणारं क्षेत्ररक्षण पाहून सेहवागचं अनोखं ट्वीट

ट्रेंडिंग लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---