इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. १९ सप्टेंबरला हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होईल.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २० सप्टेंबरला दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे. तर त्यांचा स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) बरोबर खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप आयपीएलमध्ये एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
अशा परिस्थितीत संघाचे लक्ष युएईमध्ये पहिल्या विजेतेपदावर आहे. आणि त्यासाठीही खेळाडू नेट्सवर कसून सराव करीत आहेत.
सराव सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतदेखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्यात पंतने उत्कृष्ट रिव्हर्स स्कूप शॉट खेळला, ज्याचे सर्वजण कौतुक करीत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटलच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.
📘 𝘞𝘩𝘢𝘵 𝘵𝘰 𝘌𝘹𝘱𝘦𝘤𝘵 𝘸𝘩𝘦𝘯 𝘙𝘪𝘴𝘩𝘢𝘣𝘩'𝘴 𝘉𝘢𝘵𝘵𝘪𝘯𝘨 ➡️ Chapter 1️⃣#Dream11IPL #YehHaiNayiDilli @RishabhPant17 pic.twitter.com/3HM14vslKl
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) September 15, 2020
या व्हिडिओमध्ये पंतने हा रिव्हर्स स्कूप शॉट वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या चेंडूवर मारला आहे. पंत त्याच्या इनोवेटीव शॉट्ससाठी प्रसिद्ध आहे. पण त्याचा रिव्हर्स स्कूप शॉटही जबरदस्त आहे.
Rishabh Pant FC, here's a little something for you 💙🙌🏻#Dream11IPL #YehHaiNayiDilli @RishabhPant17 pic.twitter.com/0r7FwKtXOe
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) September 15, 2020
मागील हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास या डाव्या हाताच्या फलंदाजाने ३७.५३ च्या प्रभावी सरासरीने ४८८ धावा केल्या होत्या. त्याने संपूर्ण स्पर्धेत २७ षटकार ठोकले. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट १६२.६६ एवढा होता.
पंतला आशा आहे की या आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करेल आणि त्याचा फॉर्म सिद्ध करेल. त्याच्या खराब फॉर्ममुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याची जागा केएल राहुलने घेतली होती. त्यामुळे राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून एक प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे.
पंत याचा फॉर्म दिल्ली कॅपिटल्ससाठी देखील खूप आवश्यक आहे. संघाला बळकट करण्यासाठी दिल्लीने आर अश्विन, अजिंक्य रहाणे आणि शिमरॉन हेटमीयर यासारख्या खेळाडूंची संघात भर घातली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल २०२० संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, डेनियल सॅम्स, एलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नोर्ट्जे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा