भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. या सामन्यांत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २११ धावा केल्या. या मध्ये इशान किशनने सर्वाधिक ७६ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रिषभ पंत आणि अपकर्णधार हार्दिक पंड्या यांनी तुफानी खेळी करत डावाचा शेवट गोड केला. मात्र, गोलंदाजांना हे २१२ धावांचे लक्ष्य रोखण्यास अपयश आले आणि दक्षिण आफ्रिकेने हा सामना ७ गडी राखत खिशात घातला. या सामन्यानंतर पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतने हळहळ व्यक्त केली.
भारतीय संघाचा कर्णधार रिषभ पंतने सामन्यानंतर सांगितले की, “आम्ही मोठी धावसंख्या उभारली, आम्ही विजयाच्या जवळ होतो. पण, कधी कधी विरोधी संघालाही श्रेय द्यावे लागते. डेव्हिड मिलर आणि रॉसी व्हॅन ड्युसेन यांनी या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्यामुळेच सामना आमच्यापासून दूर गेला. आम्ही फलंदाजी केली तेव्हा खेळपट्टी संथ होती, पण दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगली झाली.” पुढे बोलताना पंत म्हणाला की, “सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. मात्र, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली.”
सामन्यात अनुभवी भुवनेश्वर कुमारने ४ षटकात ४३ धावा दिल्या. त्याचवेळी आवेश खानने ४ षटकात ३५ धावा दिल्या. हर्षल पटेलही चांगलाच महागडा ठरला आणि त्याने ४ षटकांत ४३ धावा दिल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने चार षटकांत ४० धावा दिल्या. हार्दिकने एका षटकात १८ धावा दिल्या. शिवाय आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल वाईटरित्या फ्लॉप झाला. त्याने दोन षटकात २४ धावा दिल्या. एकूणच या गोलंदाजांनी सामन्यात केवळ तीन विकेट घेतल्या. या सर्व गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभ पत्कारावा लागला.
दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इशान किशनने भारतीय संघाकडून सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने २३ धावांचे योगदान दिले. भारताने दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे आफ्रिकन संघाने ३ गडी गमावून पूर्ण केले. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे सलग १३ टी२० सामने जिंकण्याचे स्वप्नही भंगले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
यजमान संघावर विजय मिळवताच खूष झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने केले मोठे विधान
चेंडू आहे की बंदुकीची गोळी? आवेश खानचा खतरनाक यॉर्कर, डुसेनच्या बॅटचे केले दोन तुकडे
इतकी हिंमत!! पंतला धावबाद करण्यासाठी रबाडाची चिटिंग, भर मैदानात भारतीय कर्णधाराला दिला धक्का
काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती