इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा प्रारंभ झाल्यापासून सर्वत्र क्रिकेटचे वारे पसरले होते. परंतु कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या वेळी खेळाडूंसह त्यांच्या पत्नी देखील त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होत्या. अशातच रॉबिन उथप्पाच्या पत्नीने जुन्या आठवणींना उजाळा देत एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर साक्षी सिंग धोनीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रॉबिन उथप्पाला आयपीएल २०२१ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच त्याची पत्नी शीतल गौतम ही देखील त्याच्यासोबत होती. शीतल गौतम आणि एमएस धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी या फार जुन्या मैत्रीणी आहेत. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. अशातच शीतलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये एमएस धोनी, साक्षी धोनी, रॉबिन उथप्पा आणि शीतल गौतम दिसून येत आहेत. या फोटोवर शीतलने लिहिले की, “साक्षी….आज मला तुझी खुप आठवण येत आहे. परंतु मी आशा करते की, लवकरच आपण भेटू, खूप प्रेम.” या फोटोवर साक्षी सिंग धोनीने प्रतिक्रीया देत लिहिले की, “मी अशी आशा करते की, लवकरच आपण भेटू.”
चेन्नई सुपर किंग्ज संघाची उल्लेखनीय कामगिरी
गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकांवर समाधान मानावे लागले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ जोरदार पुनरागमन केले आहे. तसेच चेन्नई संघातील खेळाडू जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते.
यंदा चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आधारस्तंभ हरपला! माजी भारतीय गोलंदाजाचे वडिल कालवश, त्यांच्यासाठी अर्ध्यातून सोडली होती आयपीएल