टेनिस विश्वातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने गुरुवारी (15 सप्टेंबर) याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कपनंतर आपण कोणतेही ग्रँडस्लॅम अथवा एटीपी स्पर्धा खेळणार नसल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पत्र शेअर करत त्याने ही घोषणा केली.
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
फेडररने लिहिलेल्या पत्रात आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. आपले कुटुंब, मॅनेजर, स्टाफ, विरोधी खेळाडू तसेच चाहत्यांना तो धन्यवाद म्हणाला. माझी आणखी खेळण्याची इच्छा असली तरीही 41 व्या वर्षी शरीर साथ देत नसल्याने थांबावे लागले असे त्याने म्हटले. फेडररने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. टेनिस इतिहासात त्याच्यापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम राफेल नदाल व नोवाक जोकोविचने जिंकली आहेत.
रॉजर फेडरर याला 21 व्या शतकातील सर्वात महान टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. 1998 मध्ये व्यावसायिक टेनिसला सुरुवात करणाऱ्या फेडररने 2003 मध्ये विम्बल्डनच्या रुपाने त्याने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. त्यानंतर आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 5 अमेरिकन ओपन व 1 फ्रेंच ओपन जिंकले आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने तब्बल 103 ग्रँडस्लॅम आणि एटीपी असून विजेतेपदे जिंकली असून, दुहेरीत 2008 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश
‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित