लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरु असून रविवारी या सामन्याचा चौथा दिवस होता. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे आव्हान उभे केले आहे. मात्र, याचवेळी भारतासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरणार नाहीत. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माला डाव्या गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत आहे, तर पुजाराच्या डाव्या पायाच्या घोट्यामध्ये वेदना होत आहे. त्यांच्यावर सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
UPDATE – Rohit Sharma and Cheteshwar Pujara will not take the field. Rohit has discomfort in his left knee while Pujara has pain in his left ankle. The BCCI Medical Team is assessing them. #ENGvIND pic.twitter.com/ihMSUPR7Im
— BCCI (@BCCI) September 5, 2021
रोहित आणि पुजारा यांनी या सामन्यातील दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली होती. रोहितने १२७ धावांची खेळी केली होती. तर पुजाराने ६१ धावांची खेळी केली होती. हे दोघेही ८१ व्या षटकात ऑली रॉबिन्सनविरुद्ध बाद झाले होते.
त्या दोघांनंतर रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूर या दोघांनीही अर्धशतके केली. पंतने ५० धावांची, तर शार्दुलने ६० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा करत ३६७ धावांची आघाडी घेतली आणि इंग्लंडसमोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ख्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात १९१ धावा केल्या आहेत. तर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
स्वत:च्याच विकेटवर वैतागला विराट, आऊट होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतताच केले असे काही, पाहा व्हिडिओ
टोकियो पॅरालिम्पिकची सांगता! भारताने १९ पदकांसह रचला इतिहास, पदकतालिकेत देशाला मिळाला ‘हा’ क्रमांक
शिक्षकदिन! आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास