Rohit-Virat In Sri Lanka : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता उभय संघातील केवळ एक सामना शिल्लक असून 30 जुलैला सामना पार पडेल. त्यानंतर भारत विरुद्ध श्रीलंका संघ 2 ऑगस्टपासून वनडे मालिका खेळतील. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या मालिकेसाठी हिटमॅन, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर श्रीलंकेत पोहोचले आहेत.
रोहित-कोहली श्रीलंकेत पोहोचले
रोहित, कोहली यांच्यासह वनडे संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेला खेळाडू हर्षित राणा रविवारी (28 जुलै) श्रीलंकेला पोहोचला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टी20 संघ मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले येथे अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर वनडे संघात समाविष्ट केलेले खेळाडू रोहितच्या नेतृत्वाखालील संघात सामील होतील. टी20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर रोहित, कोहली आणि कुलदीप यादव पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत.
Captain Rohit Sharma clicked at Colombo airport Sri Lanka with Shreyas Iyer ✨📸
The mission of CT for Captain @ImRo45 🐐🇮🇳🔥 pic.twitter.com/iFkfzYprZO
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 29, 2024
श्रेयस अय्यरचे पुनरागमन होणार
श्रेयस अय्यरही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात परतणार आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून शेवटचा मर्यादित षटकांचा सामना खेळला होता. वनडे संघात समाविष्ट असलेले हे सर्व खेळाडू सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली कोलंबोमध्ये सराव करतील. श्रीलंकेविरुद्धचे तिन्ही वनडे सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील. पहिला सामना 2 ऑगस्टला, दुसरा 4 ऑगस्टला आणि तिसरा सामना 7 ऑगस्टला होणार आहे.
Shreyas Iyer and Rohit Sharma arrived in Sri Lanka for the ODI series. Soon they will join the team India 🇮🇳 pic.twitter.com/Qq6Y9hBZ3X
— Pick-up Shot (@96ShreyasIyer) July 29, 2024
KING KOHLI IS BACK…!!!!! 🐐
– Virat Kohli has reached Sri Lanka for the ODI series. (RevSportz). pic.twitter.com/hIqpXzD09Q
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 29, 2024
रोहितचा गंभीरसोबतचा पहिला दौरा
राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतलेल्या गौतम गंभीरने आपल्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेने केली आहे. पण रोहितसोबत तो वनडे मालिकेपासून त्याच्या कामाची सुरुवात होईल. रोहित आणि गंभीर यापूर्वी एकत्र खेळले आहेत. पण आता प्रशिक्षक आणि कर्णधार म्हणून त्यांची केमिस्ट्री कशी आहे? हे पाहणे मनोरंजक असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा
पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल
“2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेटपटू जिंकणार सुवर्णपदक…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य