नवी दिल्ली। प्रतिष्ठित टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील हंगामाचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. भारतात वाढत्या कोव्हिड- १९ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. लीगचा १३ वा हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघ कसून सराव करताना दिसत आहेत, तर खेळाडू सोशल मीडियावरही चाहत्यांसाठी फोटो-व्हिडिओ शेअर करीत आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) मुलगी समायरा संघाच्या हॉटेलमध्ये मजा करताना दिसली.
कर्णधार रोहितसह काही खेळाडूही आपल्या कुटूंबाला बरोबर घेऊन युएईला गेले आहेत. रोहितची पत्नी रितिकाने (Ritika Sajdeh) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी समायरा संघाच्या रूममध्ये हातात माईक घेऊन मजा करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CEy-3uJleV7/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओमध्ये रितिका समायराला माईकमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी बोलण्यास सांगत आहे. समायरा ही तसंच करताना दिसतेय. आणि माईकमध्ये बोलल्यामुळे आवाज गुंजत आहे. जो ऐकून मजा येत आहे.
विक्रमी चारवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारी मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चमचमती ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-केकेआरचा ‘तो’ नवा खेळाडू आहे केविन पीटरसनपेक्षाही खतरनाक, यावेळी करणार…
-आयपीएल संघांची वाढली डोकेदुखी, ‘या’ २ संघातील खेळाडू खेळणार नाहीत आयपीएलचे सुरुवातीचे सामने
-पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांवर येऊ शकते बंदी; पहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-मिस्टर आयपीएल रैनाच्या जागी हे ४ खेळाडू बनतील चेन्नई संघाचे उपकर्णधार
-रोहित-धोनी नव्हे तर ‘हे’ ३ क्रिकेटर्स आयपीएल २०२०मध्ये पटकावतील सर्वाधिक षटकार मारण्याचा अवॉर्ड
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!