कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट स्टेडियमचे रुपांतर कोरोना व्हायरसच्या तपासणी केंद्रामध्ये झाले आहे. त्याचबरोबर आता या यादीमध्ये इंग्लंडच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमलाही कोरोना व्हायरसचे तपासणी केंद्र बनविण्यात आले आहे.
याच एजबॅस्टन मैदानावर भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने ३ शतके ठोकली आहेत. या मैदानावर रोहितने २०१७मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिले शतक केले होते. यावेळी त्याने नाबाद १२३ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने जून २०१९मध्ये इंग्लंडविरुद्ध १०२ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच जुलै २०१९मध्ये रोहितने १०४ धावा केल्या होत्या.
एका वृत्तानुसार, काऊंटी क्रिकेट क्लब वॉर्विकशायरने (Warwickshire County Cricket Club) एजबॅस्टन स्टेडियम (Edgbaston stadium) सरकारकडे सोपविले आहे. जेणेकरून या मैदानाचा वापर कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी करण्यात येईल.
काऊंटी क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील स्नोबॉल (Neil Snowball) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमचे काऊंटी क्रिकेट वेळापत्रक, कॉन्फरन्स आणि स्पर्धा या सर्व २९ मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत. आमचे कर्मचारी या कठीण परिस्थितीत आपल्या स्थानिक व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक पर्याय शोधत आहेत.”
काऊंटी क्रिकेट क्लबने सांंगितले की, एनएचएस (National Health Services) स्टाफचे कोविड-१९ तपासणी केंद्र काही दिवसांमध्ये कार्य सुरु करण्यात येईल. हे सर्व एजबॅस्टन स्टेडियममध्ये पुढच्या आदेशापर्यंत असेच राहील.
माध्यमांमधील वृत्तानुसार स्टेडियममधील मुख्य वाहनतळाचा वापर राष्ट्रीय आरोग्य सेवामध्ये कार्य करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या परीक्षणासाठी उपयोग केला जाईल.
याव्यतिरिक्त ज्या व्यक्तींची कोविड-१९ (Corona Virus) ची तपासणी करावी लागेल जेणेकरून ते एजबॅस्टन मार्गावरून प्रवेश करू शकतात. तसेच फक्त गाडीचा वापर करून आतमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर ते पर्शोर मार्गानेच बाहेर येऊ शकतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतातून परतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या कोरोना टेस्टचा आला निकाल
–भारताचे फिल्डींग कोचही नाहीत मागे, कोरोना बाधितांसाठी केली अशी मदत
–कोरोना बाधितांना मदत करणारी ही ठरली पहिली आयपीएल टीम