डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी युवा यशस्वी जयस्वाल व कर्णधार रोहित शर्मा यांनी शतके ठोकली. हे रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील 10वे शतक ठरले. या सोबतच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या दमदार कसोटी आकडेवारीला आणखी शानदार केले.
पहिल्या दिवशी 30 धावांवर नाबाद असलेल्या रोहितने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काहीसा सावध खेळ दाखवला. यादरम्यान त्याने आपले पंधरावे अर्धशतक पूर्ण केले. लंच नंतर दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाल्यावर त्याने काहीसा आक्रमक पवित्रा घेत चौकार षटकार वसूल केले. जयस्वालने शतक पूर्ण केल्यानंतर रोहितने देखील फारसा वेळ न घालवता दोन चौकार ठोकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे शतक झळकावले. मात्र, यानंतर पुढच्या चेंडूवर तो बाद होऊन परतला. बाद होण्यापूर्वी त्याने 221 चेंडूवर 103 धावांची खेळी केली. यामध्ये 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता.
वेस्ट इंडीजविरूद्ध रोहितचा हा केवळ पाचवा कसोटी डाव होता. विशेष म्हणजे या पाच पैकी तीन डावांमध्ये तो शतकाची वेस ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे. 2013 मध्ये याच संघाविरुद्ध कोलकाता येथे पदार्पण करताना त्याने पहिल्या सामन्यात 177 तर मुंबई येथे दुसऱ्या सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतरच्या दोन डावांमध्ये अनुक्रमे नऊ व 41 धावा त्याने केल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा शतक ठोकत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आपली आकडेवारी आणखी शानदार केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाकडे आता या कसोटी सामन्यात 162 धावांची आघाडी आहे. यशस्वी जयस्वाल 143 तर विराट कोहली 36 धावा करून नाबाद आहे. तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेत सामन्यावर पूर्ण कब्जा करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
(Rohit Sharma Mind Blowing Records Against West Indies In Test)
महत्वाच्या बातम्या –
‘रोहित शर्मा फरारी आहे, पण तो…’, माजी दिग्गजाचे विधान वेधतंय क्रिकेटप्रेमींचं लक्ष
क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता