---Advertisement---

‘द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची खेळाडूंना नव्हती कल्पना’, रोहितचा खुलासा

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 10:29 AM
---Advertisement---

बुधवारी रात्री (०३ नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली असल्याची माहिती दिली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाणारे द्रविड टी२० विश्वचषकानंतरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून संघाच्या प्रशिक्षकपदी रुजू होणार आहेत. परंतु भारतीय संघातील खेळाडूंना द्रविड आपले महागुरू बनणार असल्याची कसलीही पूर्वसूचना मिळाली नसल्याचे समजत आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने यासंदर्भात खुलासा केला आहे.

द्रविड यांच्या निवडीची घोषणा करतेवेळी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा ३३ वा सामना खेळत होते. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने बऱ्याचशा गोष्टीसंदर्भात खुलासा केला आहे. यावेळी तो द्रविडच्या निवडीविषयीही बोलला आहे.

पत्रकार परिषदेत द्रविडविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा. ते नव्या भूमिकेत भारतीय संघात परतल्याने त्यांचे अभिनंदन. ते भारतीय क्रिकेटचे एक दिग्गज शिलेदार आहेत. आम्ही त्यांच्या प्रशिक्षणाखाली खूप चांगले प्रदर्शन करू. परंतु अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यांची या पदी नियुक्ती होणार असल्याची आम्हाला कसलीही कल्पना आम्हाला नव्हती.”

टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर आता द्रविड त्यांची जागा घेतील. त्यांनी यापूर्वी १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि भारतीय अ संघासाठीही प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. याखेरीज द्रविड गेल्या काही वर्षापासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता. पण, आता त्याच्या जागी बीसीसीआयला नव्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला

एक नकोसा तर दोन हवेहवेसे विक्रम ‘द वाॅल’ राहुल द्रविडच्या नावावर, मोडणे आहेत केवळ अशक्य

‘हिटमॅन’चा विक्रम! रोहितने मॅन ऑफ द मॅच जिंकताच ‘या’ दिग्गजाच्या यादीत सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---