भारतीय संघाची रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही विस्फोटक सलामी जोडी आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगलीच चमकली. सुपर फोरच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मात्र, यावेळी पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटला. भारतीय सलामी जोडीने ताबडतोब फलंदाजी करत अवघ्या 14व्या षटकातच संघाचे शतक पूर्ण केले. यादरम्यान सलामीवीरांनीही त्यांची शतकी भागीदारी पूर्ण केली. आता त्यांचे वनडे भागीदारीचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे कौतुकास्पद आहेत.
भारताकडून सलामीला उतरलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Rohit Sharma And Shubman Gill) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी झाली. भारताला रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या रूपात पहिला धक्का बसला. रोहित या सामन्यात 49 चेंडूत 56 धावा करून शादाब खान याच्या गोलंदाजीवर फहीम अश्रफ याच्या हातून बाद झाला. त्याने यावेळी 4 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडला.
याव्यतिरिक्त शुबमन गिल हादेखील अर्धशतकानंतर मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. गिल 18वे षटक टाकत असलेल्या शाहीन आफ्रिदी याच्या पाचव्या चेंडूवर आगा सलमान याच्या हातात सोपा झेल देऊन बाद झाला. गिल बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 2 बाद 123 इतकी होती. यावेळी गिलने 52 चेंडूत 58 धावांचे महत्त्वपूर्ण अर्धशतकी योगदान दिले. त्याने यावेळी 10 चौकारांचाही पाऊस पाडला.
रोहित आणि गिल यांच्यातील वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सलामी भागीदारींबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानविरुद्धची त्यांची एकूण चौथी शतकी भागीदारी होती. त्यांच्यात पहिली भागीदारी 143 धावांची झाली होती. त्यानंतर त्यांच्यात 33, 96, 60, 72 धावांची भागीदारी झाली. विशेष म्हणजे, त्यांच्यातील सहावी भागीदारी ही सर्वोत्तम भागीदारी होती. यावेळी त्यांनी सलामीला 212 धावांची द्विशतकी भागीदारी झाली होती. त्यानंतर अनुक्रमे त्यांनी 3, 65, 15 आणि आशिया चषकात नेपाळविरुद्ध नाबाद 147 धावांची सलामी भागीदारी झाली होती.
Rohit-Gill opening partnerships in ODIs:
143
33
96
60
72
212
3
65
15
147*
121966 runs in 11 innings, ave 96.60,
4 100+, 8 50+ stands #INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/uKMbqH1CYm— Bharath Seervi (@SeerviBharath) September 10, 2023
वनडेतील रोहित-गिलची सलामी भागीदारी
143
33
96
60
72
212
3
65
15
147*
121
एकूण 4 शतके आणि 8 अर्धशतके
या 11 सलामी भागीदारीत त्यांनी एकूण 966 धावा चोपल्या. यावेळी त्यांची सरासरी 96.60 इतकी उल्लेखनीय होती. विशेष म्हणजे यामध्ये 4 शतके आणि 8 अर्धशतकांचाही समावेश होता. (Rohit sharma shubman Gill opening partnerships in ODIs know record)
हेही वाचाच-
नाद करा पण आमचा कुठं! टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, रोहित अन् गिलचे झंझावाती अर्धशतक
बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स