---Advertisement---

कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लागणं रोहितला वाटतंय अशक्य; म्हणे, ‘सध्यातरी त्याबद्दल विसरून जा’

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 4:13 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका पार पडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर भारताचे संघ व्यवस्थापन नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात (New Test Captain) आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल अशी नावे या पदावर आपली वर्णी लावण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यातही रोहित सध्या वनडे आणि टी२० संघाला कर्णधार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा पायउतार करत त्याला उपकर्णधार बनवले गेले होते. त्यामुळे रोहितकडे भावी कसोटी कर्णधार (Test Captaincy) म्हणून पाहिले जात आहे. 

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून उभयंतांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट बोर्ड कसोटी कर्णधाराबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात. यादरम्यान रोहितने या पदाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली (Rohit On Test Captaincy) आहे.

हेही वाचा- ‘…म्हणजे ऋतुराज, ईशानला टॉप-३ मध्ये खेळवत मी आणि धवन बाकावर बसतो,’ पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचा बाउंसर

रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. तत्पूर्वी पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला (०५ फेब्रुवारी) त्याने पत्रकार परिषदेत याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यासाठी (कसोटी कर्णधारपदाच्या निवडीसाठी) अजून वेळ आहे. सध्या माझे पूर्ण लक्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांवर आहे. माझ्यासाठी वर्कलोड मॅनेंजमेंट महत्त्वाचे आहे. यामुळे आम्ही काही मालिका गमावूही शकतो, कारण आम्हाला सातत्याने खेळाडूंना बदलत राहण्याची गरज आहे. परंतु आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे तो म्हणाला.

तसेच पुढे बोलताना त्याने म्हटले की, सध्यातरी नव्या कसोटी कर्णधाराबद्दल विसरून जा. मला अजून तरी याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. जसं की मी सांगितले, मला सध्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. 

भारतीय संघाला ६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. यावर्षी होणारा टी२० विश्वचषक आणि २०२३ चा वनडे विश्वचषक, या मोठ्या आयसीसी स्पर्धांच्या दृष्टीने भारतीय संघासाठी आगामी मालिका महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे रोहित कर्णधाराच्या रूपात लवकरात लवकर संघ बांधणी करत या स्पर्धांमध्ये तगडा संघ उतरवण्याच्या विचारात असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘….आणि माही कॅप्टन बनला!’ धोनीच्या कर्णधार बनण्याची इनसाईड स्टोरी

‘गांगुलीला खेळायचा होता टी२० वर्ल्डकप पण द्रविडने…’ १५ वर्षांनी झाला गौप्यस्फोट

‘…म्हणजे ऋतुराज, ईशानला टॉप-३ मध्ये खेळवत मी आणि धवन बाकावर बसतो,’ पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचा बाउंसर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---