भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ४ कसोटी सामन्याची मालिका सुरू असून, मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. यादरम्यान नुकतीच बातमी समोर येत आहे की, ७ डिसेंबर रोजी सिडनी येथे होणारा तिसरा सामना मेलबर्न येथेच खेळवला जाऊ शकतो. सिडनी येथे सध्या कोरोनाचा नवा उद्रेक सुरू झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण दरम्यान सिडनी येथे कॉरंटाइन असेलला भारताचा स्टार बॅट्समन रोहित शर्मा देखील येत्या ३० तारखेला मेलबर्न येथे भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, सिडनी येथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जाऊ शकतो. रोहित शर्मा सध्या सिडनी येथील एका हॉटेलमध्ये आपला १४ दिवसांचा कॉरंटाइन कालावधी घालवत असून, येत्या ३० डिसेंबर रोजी तो हा कालावधी पूर्ण करुन मेलबर्न येथे संघासोबत जोडणार आहे. दुसऱ्या सामन्यात उत्तम कामगिरी करत असलेल्या भारतीय संघाला रोहितच्या आगमनाने आणखी मजबूती मिळणार आहे.
मेलबर्नलाच होऊ शकतो तिसरा कसोटी –
न्यू साउथ वेल्सची राजधानी असलेल्या सिडनीमध्ये जर तिसरा कसोटी सामना झाला तर, १५ डिसेंबर पासून ब्रिस्बेन येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यावर संकट येऊ शकते. कारण ,कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेता सरकारने सिडनी येथून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीसाठी १४ दिवसांचा कॉरंटाइन कालावधी सक्तीचा केला आहे. अशा परिस्थितीत दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथेच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एमसीजीचे अध्यक्ष स्टुअर्ट फॉक्स यांनी तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. एका स्थानिक न्युज पेपर मध्ये मुलाखत देताना ते म्हणाले, ‘आमच्यासाठी निश्चितच ही आनंदाची बाब आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी जे योग्य असेल, ते आम्ही करण्यासाठी तयार आहोत. मेलबर्न येथेच तिसरा कसोटी सामना होणार हे नक्की झाले, तर आम्ही सरकारला आमच्या प्लॅन बद्दल संपूर्ण माहिती देऊ. आम्ही तिसऱ्या सामन्यासाठी प्रेक्षकांची संख्या वाढविण्याबाबत देखील विचार करत आहोत. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर याबाबत अंतिम बातमी समोर येईल.’
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेच्या शतकानंतर टीम इंडिया ‘अजिंक्यच’, पाहा काय आहे आकडेवारी
‘त्याला’ बाद देणे चूकीचेच, मॅथ्यू वेडने व्यक्त केली नाराजी
असा प्रामाणिक क्रिकेटर होणे नाही! नाबाद असतानाही सोडलं मैदान