---Advertisement---

IND vs NZ | रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही जिंकली नाणेफेक, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

On: शनिवार, जानेवारी 21, 2023 1:12 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये आयोजित केला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्याप्रमाणेचे दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेक जिंकली. रायपूरमधील खेळपट्टीचा विचार करून रोहितने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या विचाराने मैदानात उतरणार असून पाहुण्या न्यूझीलंडला त्यांचे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे.

भारतीय संघाने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, त्यासाठी सर्वत्र संघाचे कौतुक होत आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याने स्वतःचे पहिले आंतरराष्ट्रीय द्विशतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. याच कारणास्तव भारतीय संघात दुसऱ्या वनडे सामन्यात एकही बदल पाहायला मिळाला नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूजीलैंड – फिन एलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर, हेनरी शिपली, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर.

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायपूरमध्ये पहिल्यांदाच खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि स्टेडियमच्या इतिहासाविषयी
ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवचा बृजभूषण यांना पाठिंबा; म्हणाला, “हरियाणाच्या कुस्तीपटूंनी कट…” 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---