---Advertisement---

SAvsIND: पहिल्याच वनडेत आफ्रिकेची धूळधाण उडवल्यानंतर कर्णधार राहुलचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला…

On: सोमवार, डिसेंबर 18, 2023 9:55 AM
KL-Rahul
---Advertisement---

KL Rahul Statement on India Victory: भारतीय संघाने केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेची विजयी सुरुवात केली. जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार अर्शदीप सिंग ठरला. त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराचा सन्मानही मिळाला. विशेष म्हणजे, या विजयानंतर कर्णधार राहुल भलताच खुश झाला. त्याने मोठे विधान केले.

मालिकेत भारताची आघाडी
रविवारी (दि. 17 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या वेळी त्यांचा संपूर्ण डाव 27.3 षटकात अवघ्या 116 धावांवर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. भारताकडून यावेळी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने सर्वाधिक 5, तर आवेश खान याने 4 आणि कुलदीप यादव याने 1 विकेट घेतली. हे आव्हान भारतीय (Team India) संघाने 16.4 षटकात म्हणजेच तब्बल 200 चेंडू आणि 8 विकेट्स राखून पार केले. यावेळी भारताकडून पदार्पणवीर साई सुदर्शन (Sai Sudharsan) याने सर्वाधिक नाबाद 55 धावा, तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 52 धावा केल्या. तसेच, भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.

काय म्हणाला राहुल?
खरं तर, मागील वर्षी राहुल कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेत भारतीय संघाला 0-3ने व्हाईटवॉश दिला होता. भारताला अनुक्रमे 31 धावा, 7 विकेट्स आणि 4 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता मालिकेची विजयी सुरुवात केल्यानंतर राहुल मोठी गोष्ट बोलून गेला. तो म्हणाला, “मागच्या वेळी इथे कर्णधाराच्या रूपात सलग तीन वनडे सामने गमावले होते. दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवून आनंदी आहे. फिरकीपटूंना सामन्यात आणण्याची योजना होती, पण सुरुवातीला खेळपट्टीवर खूप मदत मिळत होती. आमच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.”

यासोबतच त्याने हेही सांगितले की, मागील काही वर्षांपासून क्रिकेट कसे खेळले जात आहे. तो म्हणाला, “प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडूंना बदलणे आणि हटवणे खासकरून गोलंदाजी आक्रमणात बदल करणे हीच पद्धत आहे. हे लक्षात घेऊन मागील काही वर्षांमध्ये क्रिकेट खेळले जात आहे. तुम्हाला काही खेळाडूंना विश्रांती द्यावी लागते. तुम्हाल प्रत्येक वेळी एका प्रकाराला प्राथमिकता द्यायची असते. आता असे टी20 आणि कसोटीत आहे. मात्र, आम्ही त्यांना संधी देणे योग्य समजले, जे सर्वोत्तम प्रदर्शन करून आले आहेत. प्रत्येकाने प्रथम श्रेणी आणि आयपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले. मी त्या सर्व खेळाडूंसाठी खूप खुश आहे, ज्यांनी यश मिळवले.”

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पुढील सामना मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 4.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. (sa vs ind 1st odi indian captain kl rahul feels happy after winning against south africa as captain)

हेही वाचा-
IPL 2023 । सचिनने मुंबई इंडियन्सची साथ सोडली? समोर आली महत्वाची माहिती
SA vs IND । ‘…तर आनंदच होईल’, कसोटी मालिकेपूर्वी केएल राहुलने व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---