---Advertisement---

ऐकावं ते नवलंच! दुसराच सामना खेळणाऱ्या शाहबाझ नदीमची तुलना मांजरेकरांनी केली ‘या’ दिग्ग्जासोबत

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 12:42 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम ( चेपॉक) मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नानेफेकीच्या वेळी दोन्ही संघाने आपल्या ११ खेळाडूंची नावे जाहीर केली. यावेळी भारतीय संघाच्या ११ खेळाडूंच्या यादीमध्ये सर्वांनाच आश्चर्य करणाऱ्या शाहबाज नदीम याचे नाव होते.

अक्षर पटेल बाहेर तर शाहबाज नदीमला संघात स्थान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दुखापत झाल्यामुळे संघातून बाहेर झालेल्या रवींद्र जडेजा याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. याच कारणास्तव अक्षर पटेल याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी अक्षर पटेल याला संघात संधी मिळणार होती. परंतु सामन्यापूर्वी सराव करत असताना त्याला दुखापत झाली आणि शाहबाज नदीम याला संघात समाविष्ट करण्यात आले.

शाहबाज नदीमची तुलना वेंकटपती राजू सोबत

शाहबाज नदीम याला नशिबाने पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले आहे. सामना सुरू असताना पूर्व भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी ट्विट केले. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले, “शाहबाज नदीम, वेंकटपती राजू सारखे आहेत.” त्यांनी आपल्याच ट्विट मध्ये इतकेच लिहले आहे. त्यांनी ही तुलना कशाबद्दल केली आहे, याचा मात्र त्यांनी उल्लेख केला नाहिये. ३१ वर्षीय शाहबाज नदीम याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द नुकतीच सुरु झाली आहे. तो कारकिर्दीतील दुसराच सामना खेळत आहे.

कोण आहे वेंकटपती राजू??

भारतीय संघासाठी वेंकटपती राजू यांनी १९९० च्या दशकात भारतीय संघासाठी २८ कसोटी सामने आणि ५३ एकिवसीय सामने खेळले आहे. त्यावेळी मोहम्मद अजहररुद्दीन हे भारतीय संघाचे कर्णधार होते. अनिल कुंबळे , राजेश चौहान आणि वेंकटपती राजू यांच्या तिकडीने भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत.

शाहबाज नदीमची कामगिरी

शाहबाज नदीम याने खेळलेल्या ८३ प्रथम श्रेणी सामन्यात १४.७५ च्या सरासरीने १६३८ धावा केल्या आहेत. याच ५ अर्धतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्याने ३०७ विकेट्स ही घेतल्या आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत( विकेटकिपर), आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा,जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस

मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ

BAN vs WI : मेहदी हसनची अष्टपैलू कामगिरी, पहिल्या कसोटीवर बांग्लादेशची मजबूत पकड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---