---Advertisement---

‘संजू सॅमसनने निवृत्ती घ्यावी’, टीम इंडियातून वगळण्यात आल्याने सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

On: मंगळवार, नोव्हेंबर 21, 2023 1:21 PM
Sanju Samson
---Advertisement---

विश्वचषक 2023 फायनलमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर आता भारतीय संघासमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. वास्तविक, भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचे यजमानपद भूषवणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. हार्दिक पांड्याच्या जागी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. त्याला संघात स्थान मिळाले नाही.

संजू सॅमसन भारताकडून शेवटचा आयर्लंडविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला, पण राखीव खेळाडू म्हणून. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही सॅमसनला स्थान मिळाले नाही.

संघातून वगळण्यात आल्याने चाहते प्रचंड संतापलेले दिसले. त्यांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला. एका चाहत्याने तर संजू सॅमसनने निवृत्त व्हावे, असे लिहिले आहे. जेणेकरून बीसीसीआयच्या तोंडावर जोरदार चपराक बसेल. त्याचवेळी अनेक चाहत्यांनी संजू सॅमसनसाठी दु:ख व्यक्त करत ‘बॅड लक’ लिहिले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार (Sanju Samson should retire fans are angry on social media after being excluded from Team India)

म्हत्वाच्या बातम्या

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का! भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतून वॉर्नर बाहेर, महत्त्वाचं कारण आलं समोर
INDvsAUS Final: ऑस्ट्रेलियाने का जिंकला वर्ल्डकप? ‘या’ निर्णयामुळे बनले सहाव्यांदा चॅम्पियन, सेहवागचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---