वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (6 ऑगस्ट) खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडला. या मालिकेपूर्वी चर्चा झालेल्या संजू सॅमसन याला सलग दुसऱ्या सामन्यात आपला प्रभाव पाडता आला नाही.
गयाना येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल 7 व सूर्यकुमार यादव 1 धाव करून बाद झाल्यानंतर संजू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी असताना, तो 7 चेंडूंवर केवळ 7 धावा करून यष्टीरक्षक पूरनच्या हाती झेल देत बाद झाला. त्याला अकील होसेनने बाद केले.
संजू या मालिकेतील पहिल्या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. त्यावेळी 12 चेंडू मध्ये 12 धावा करत तो धावबाद झालेला. त्याआधी वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने आक्रमक फटकेबाज करताना अर्धशतक झळकावले होते. तर, दुसऱ्या सामन्यात तो 9 धावांवर बाद झालेला.
संजू याने भारतीय संघासाठी 2013 मध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फारशी संधी मिळाली नाही. आगामी वनडे विश्वचषकासाठी त्याचा संघात समावेश करावा अशी मागणी अनेक दिग्गज करत आहेत. मात्र संजू याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने अनेक जण त्याच्यावर टीका देखील करतात. या दौऱ्यावर अद्याप तो फारसा प्रभावीत करू शकला नसला तरी, आगामी तीन सामन्यांमध्ये तसेच त्याचा संघात समावेश झाल्यास त्याच्याकडे ही अखेरची संधी असू शकते.
(Sanju Samson Yet Another Low Score Against West Indies)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी
“धोनीबद्दल सर्व मी लिहून ठेवलेय”, अफगाणिस्तानच्या खेळाडूचा मोठा खुलासा