राजस्थान रॉयल्स आयपीएल 2023मध्ये प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि सलामीवीर जोस बटलर यांची बॅट शांत आहे. हे दोन्ही फलंदाज चालू आयपीएल हंगामात अपेक्षित खेळी करू शकले नाहीत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने प्रतिक्रिया दिली.
आकाश चोप्राच्या मते कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) धावा करत नसल्याने संघासाठी ही चिंतेची बाब आहे. रविवारी (30 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानने या सामन्यात 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य 19.3 षटकांमध्ये गाठले. या सामन्यात देखील सॅमसन आणि बटलरची बॅट शांत दिसली होती. सॅमनने 10 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. तर बटलरने 19 चेंडूत 18 धावा केल्या होत्या.
राजस्थानचे प्रमुख खेळाडू धावा करत नाही, ही चिंतेची बाब – आकाश चोप्रा
आपल्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्रा म्हणाला, “राजस्थान रॉयल्ससाठी अजून एक मोठी समस्या आहे. त्यांचा जोश बटलर आधी ज्या पद्धतीने धावा करायचा तशा धावा आता करत नाहीये. संघाने सुरुवात चांगली केली, पण बटलरला धावा करता आल्या नाहीत. संजू सॅमसनच्या बॅटमधूनही धावा येत नाहीयेत. शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल हे फलंदाज धावा करत असल्यामुळे राजस्थआन जिंकत आहे. पण दोन प्रमुख फलंदाज धावा करत नाहीत, ही संघासाठी चिंतेची बाब आहे.”
बटलरने या आयपीएल हंगामातील सुरुवातीच्या 9 सामन्यांमध्ये 308 धावा केल्या. दुसरीकडे सॅमनने मात्र हंगामातील 9 सामन्यांमध्ये 212 धावा केल्या आहेत. बटलर आणि सॅमसनची सरासरी अनुक्रमे 32.11 आणि 23.55 राहिली आहे. राजस्थान रॉयल्सला हंगामातील आपला 10 वा सामना गुजरात टायन्सविरुद्ध शुक्रवारी ( 5 मे) खेळायचा आहे. (Sanju Samson’s poor form is a matter of concern for Rajasthan Royals, says Akash Chopra)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केदारने सांगितली आयपीएल कमबॅकची कहाणी! म्हणाला, “मी कॉमेंट्री करत होतो आणि…”
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी