पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात यश जगदाळे 97, श्रेयश केळकर 85, टिळक जाधव 61, यांनी केलेल्या धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने संयुक्त जिल्हा संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेत विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात केडन्स संघाच्या 121धावांच्या आघाडीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या दोन दिवसीय लढतीत आज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा पहिला डाव आज सुरु झाला. तत्पूर्वी काल संयुक्त जिल्हा संघाने 90षटकात 6बाद 406धावा केल्या होत्या. व्हेरॉक संघाने 89.4षटकात 8बाद 409धावा करून संघाचा डाव घोषित केला. यामध्ये यश जगदाळे 97, श्रेयश केळकर 85, टिळक जाधव 61, आदित्य एकशिंगे 52, रोहित चौधरी नाबाद 41, अविराज गावडे 14 यांनी धावा काढून संघाला 3धावांची आघाडी मिळवून देत विजय मिळवला. संयुक्त जिल्हा संघाकडून क्षितिज पाटीलने 69धावात 3 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात केडन्स व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यातील दोन दिवसीय लढतीत काल केडन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 90षटकात 9बाद 249धावा केल्या होत्या. आज पीवायसी संघाचा डाव बिनबाद 12धावांपासून पुढे सुरु झाला. पीवायसी संघाचा डाव 39.5षटकात 128धावावर संपुष्टात आला. यामध्ये आदर्श बोथरा 28, यश माने 35, आदित्य लोंढे 35 यांनी धावा केल्या. केडन्सकडून यतीन मंगवानीने 58धावात 4गडी तर, प्रद्युम्न चव्हाणने 30धावात 3गडी बाद करून संघाला पहिल्या डावात 121धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात आजदिवस अखेर प्रद्युम्न चव्हाण 83(126,11×4), तेजस बांदल 78 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर केडन्स 42.2षटकात 2बाद 177धावा केल्या. पण केडन्स व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यातील अनिर्णित सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: संयुक्त जिल्हा संघ: 90षटकात 6बाद 406धावा(ओंकार यादव 166(258,20×4,2×6), प्रथमेश बजारी 126(154,17×4), क्षितिज पाटील नाबाद 60(75,8×4), सौरभ गढक 20, रोहित चौधरी 24-133-2, यश जगदाळे 9-48-2, हर्षवर्धन पवार 13-51-1)पराभूत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 89.4षटकात 8बाद 409धावा(डाव घोषित)(यश जगदाळे 97(111), श्रेयश केळकर 85(123), टिळक जाधव 61(90), आदित्य एकशिंगे 52(70), रोहित चौधरी नाबाद 41(32), अविराज गावडे 14, क्षितिज पाटील 3-69, रोहन थोरात 1-54); सामना अनिर्णित; पहिल्या धावाच्या आघाडीच्या जोरावर व्हेरॉक संघ विजयी;
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: कॅडेन्स: 90षटकात 9बाद 249धावा(यश मंगवानी नाबाद 61(88,5×4,2×6), आर्यन ए. 40(79,4×4), प्रद्युम्न चव्हाण 36, अभिजित सावळे 34, तेजस बांदल 30, यश खळदकर 4-26, आर्या जाधव 1-63, आदर्श बोथरा 2-34)वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 39.5षटकात सर्वबाद 128धावा(आदर्श बोथरा 28(36), यश माने 35(51), आदित्य लोंढे 35(53), यतीन मंगवानी 4-58, प्रद्युम्न चव्हाण 3-30, शुभम खरात 1-9); कॅडेन्स संघाकडे पहिल्या डावात 121धावांची आघाडी;
दुसरा डाव: कॅडेन्स: 42.2षटकात 2बाद 177धावा(प्रद्युम्न चव्हाण 83(126,11×4), तेजस बांदल 78(112,12×4), आदर्श बोथरा 1-44, आर्या जाधव 1-44); सामना अनिर्णित; कॅडेन्स संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर संघ विजयी.