६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०१९, चिपळूण या स्पर्धेच्या कार्यालयाचे शनिवारी (२३ नोव्हेंबर २०१९) उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांच्या हस्ते स्पर्धा कार्यालयाचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांची सभा पार पडली. स्पर्धा नियोजना संदर्भात सभेत विषय मांडले केले. तसेच मैदानाची पाहणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील, कोषाध्यक्ष मंगल पांडे, सहकार्यवाह रवींद्र देसाई, उपाध्यक्ष नेत्रा राजे शिर्के, बाबुराव चांदीरे, दत्ता झिंजुर्डे, जे जे पाटील, सचिन भोसले, शशीकांत राऊत, प्रताप शिंदे, तसेच नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश तांबे, उपाध्यक्ष एल के शिंदे, सेक्रेटरी विलास गुजर, खजिनदार ऋषिकेश ढगळे, सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.