रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात आजची दुसरी लढत झाली. रायगड संघाने आक्रमक सुरुवात करत आघाडी मिळवली. पहिल्या दहा मिनिटात 14-4 अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर परभणी संघाच्या मारुती राठोड ने चतुरस्त्र चढाया करत रायगड संघाची आघाडी कमी केली.
मध्यांतराला 20-14 अशी रायगड संघाकडे आघाडी होती. रायगड कडून रुतिक पाटील ने चतुरस्त्र चढाया करत गुण टिपले. बचावफळीत रायगडच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन दाखवले. रायगड संघाने 37-24 असा सामना जिंकला.
रायगड कडून रुतिक पाटील ने चढाईत 16 गुण मिळवले तर राज जंगम व जयेश गावंड ने प्रत्येकी 4 पकडी केल्या. विराज पाटील, सनी भगत व अजय मोरे ने प्रत्येकी 2 पकडी केल्या. परभणी कडून मारुती राठोड ने 9 गुण मिळवले तर उद्देश बोचरे नर अष्टपैलू खेळ केला. (Second win for Raigad Maratha Marvels team)
बेस्ट रेडर- रुतिक पाटील, रायगड मराठा मार्वेल्स
बेस्ट डिफेंडर्स- उद्देश बोचरे, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- जयेश गावंड, रायगड मराठा मार्वेल्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सनरायझर्सविरूद्ध केकेआरची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी! अशी आहे प्लेईंग इलेव्हन
सेंट्रल कॉन्ट्रॅक सोडल्याचा फायदाच! जाणून घ्या ट्रेंट बोल्ट का बनला फ्रिलांस क्रिकेटर?