आयपीएलप्रमाणेच (IPL) यूएईमध्ये टी२० (UAE T20 LEAUGE) लीग आयोजित केली जाणार आहे. अमिरात क्रिकेट बोर्ड (ECB) लवकरच या लीगची घोषणा करू शकते. बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) या लीगमध्ये सहभागी होणार आहे. आधीपासूनच आयपीएल आणि सीपीएलमध्ये (CPL) शाहरुख खानचे संघ आहेत. हा त्याचा तिसरा क्रिकेट संघ असणार आहे.
भारतात जेवढा शाहरुखचा चाहता वर्ग आहे, तेवढाच यूएईत देखील आहे. त्याच पार्शभूमीवर त्याने लीगमध्ये संघ खरेदी करण्याचा निर्णय घेतला असावा. एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या लीगमध्ये एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियंन्सचे मालक मुकेश अबंनी, दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन किरण कुमार ग्रांधी, मॅंचेस्टर युनायटेड आणि कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेचचे फाउंडर राजेश शर्मा हे सर्वजण लीगमध्ये संघ खरेदी करणार आहेत. त्यव्यतिरिक्त अदानी समूह आणि अमिरात क्रिकेट बोर्ड यांच्यातील व्यवहार जवळपास पूर्ण झाला आहे. आयसीसीनेही या लीगसाठी मान्यता दिली आहे. लीगचे नाव यूएई टी२० लीग असणार आहे.
अदानी समूह संघ खरेदी करण्यासठी तयार
एका विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अमिरात क्रिकेट बोर्ड आणि अदानी समूह यांच्यातील चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत संघाची घोषणा केली जाईल. ईसीबीने थेट गौतम अदानींसोबत याविषयी चर्चा केली आहे. लीगमधील सहाव्या संघासाठी आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासह अनेक संघासोबत चर्चा झाली. इंग्लंडच्या लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लबसोबतच बिग बॅश लीगच्या सिडनी सिक्सर्स यांच्याशीही चर्चा झाली होती, परंतु अदानी समूह संघ खरेदी करण्यासाठी तयार असल्याचे समजते.
मँचेस्टर युनाइटेड देखील उतरणार मैदानात
इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनाइटेडचे मालक ग्लोसर कुटुंबही लीगमध्ये संघ खरेदी करणार आहेत. ग्लेसर कुटुंबाने यापूर्वी आयपीएमध्ये दोन संघांसाठी लिलावात सहभाग घेतला होता. पण त्यांना आयपीएल संघ खरेदी करता आला नव्हता. आता ते यूएई टी२० लीमध्ये संघ खरेदी करणार आहेत. दरम्यान, जून आणि जुलै महिन्यात लीगची सुरुवात होईल, अशी माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दिवशी होणार आयपीएल २०२२ हंगामाला सुरुवात? महाराष्ट्रात साखळी सामने होण्याची शक्यता
VIDEO| श्रीलंकन फलंदाजाला नडला आळस! फिंच-वेड जोडीने केले चपळाईने धावबाद
बुमराहला मागे टाकत चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज, फक्त करावे लागेल ‘हे’ काम