बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन चांगलाच अडचणीत सापडला आहे. काहीदिवसांपूर्वी ढाका प्रीमीयर लीगमध्ये एका सामन्यादरम्यान पंचांशी पंगा घेणे त्याला महागात पडले आहे. त्याला ३ सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर बांगलादेश टाकानुसार ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मदेन स्पोर्टिंग क्लब क्रिकेट समीतीचे अध्यक्ष मसूदुज्जमान यांनी क्रिकबझशी बोलताना पुष्टी केली. ते म्हणाले, ‘बोर्डाकडून कोणतेही अधिकृत पत्र जाहीर करण्यात आलेले नाही. पण आम्हाला कळाले आहे की पंचांच्या समीतीने त्याला ४ सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. स्वाभाविकत: त्याचे कृत्य स्विकारण्यासारखे नव्हते. पण आम्हाला हे माहित करुन घ्यावे लागले की असे का झाले.
नक्की काय आहे प्रकरण?
ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर स्पर्धेतील ४० वा सामना मोहम्मदेन स्पोर्टिंग विरुद्ध अबाहानी लिमिटेड यांच्या दरम्यान खेळला गेला. शाकिब मोहम्मदेन स्पोर्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या सामन्यात मोहम्मदेन संघाने दिलेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अबाहानी संघाकडून मुशफिकुर रहिम फलंदाजी करत होता. त्यावेळी एका षटकात शाकिब विरुद्ध खेळताना रहिमचा फटका चूकला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यावर शाकिबने जोरदार अपील केले.
मात्र, रहीमला बाद न दिल्याने शाकिब संतापला व त्याने स्टंपला लाथ मारली. त्याचबरोबर त्याने पंचांशीही वाद घातला. इतकेच नाही तर पुढील षटकात देखील त्याला संयम राखत आला नाही. मीड ऑफवरून क्षेत्ररक्षण करत असताना तो धावत पंचांकडे आला व रागाच्या भरात त्याने नॉन स्ट्राईकवरील तीनही स्टंप हाताने उखाडत खेळपट्टीवर फेकले. त्याच्या या कृत्यांमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
One more… Shakib completely lost his cool. Twice in a single game. #DhakaLeague Such a shame! Words fell short to describe these… Chih… pic.twitter.com/iUDxbDHcXZ
— Saif Hasnat (@saifhasnat) June 11, 2021
Shit Shakib..! You cannot do this. YOU CANNOT DO THIS. #DhakaLeague It’s a shame. pic.twitter.com/WPlO1cByZZ
— Saif Hasnat (@saifhasnat) June 11, 2021
टीका झालेली पाहून शाकिबने फेसबुकवर पोस्ट करत सर्वांची जाहीररित्या माफी मागितली. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत होती.
#ShakibAlHasan apologises for his on-field behaviour during #DhakaLeague match wherein he was seen kicking the stumps and arguing with umpire after failed appeal.
No apology should spare Shakib from a ban. That was disgraceful. pic.twitter.com/0wCq5iKrRo
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) June 11, 2021
यापूर्वीही शाकिबवर निलंबनाची कारवाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच्यावर २ वर्षे बंदीची कारवाई केली होती. ज्यामध्ये त्याला १ वर्षाच्या निलंबनाला सामोरे जावे लागले होते. ही बंदी पूर्ण करुन त्याने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तसेच अनेकदा तो बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या विरोधातही गेला आहे.
शाकिबची कारकिर्द
शाकिब बांगलादेशव्यतिरिक्त विविध देशांतील लीग स्पर्धांमध्येही खेळतो. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सध्या भाग आहे. शाकिबने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ५७ कसोटी सामन्यात ३९३० धावा व २१० बळी, २१२ वनडेत ६४५५ धावा आणि २६९ बळी मिळवले आहेत. तसेच, त्याने बांगलादेशसाठी ७६ टी२० सामन्यांमध्ये १५६७ धावांसह ९२ गडी बाद केले.
तसेच आयपीएलमध्ये त्याने आत्तापर्यंत ६६ सामने खेळले असून ७८४ धावा केल्या आहेत आणि ६१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-किती हा राग? एकाच सामन्यात दोन वेळा सुटला शाकिबचा संयम, रागाच्या भरात उखडले स्टंप्स
-शाकिब नरमला! ‘त्या’ कृत्याबद्दल मागितली सर्वांची बिनशर्त माफी
WTC फायनलपूर्वी विराट-रहाणेच्या संघात रंगतोय सामना, कोणते खेळाडू कोणाच्या गोटात पाहा