पुणे | आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संघांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीगमधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
ही स्पर्धा वानवडी येथील एस. आर. पी. एफ. मैदानावर सुरू आहे. या स्पधेर्तील मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली.
यात अतिक कलबर्गे ने नवव्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. यानंतर अनंतराव पवार कॉलेजच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले खरे; पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर एस. बी. पाटील कॉलेजने १-० अशी आघाडी कायम राखून बाजी मारली.
अंजूम-ए-इस्लाम आणि ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यानंतर श्री शिवाजी मराठा सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि अलन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ही लढतही बरोबरीत सुटली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना खाते उघडण्यात यश आले नाही.
यानंतर आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने लोहगावच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यश सिंघवीने बाराव्या मिनिटाला गोल करून आयोजन स्कूलला आघाडी मिळवून दिली.
ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून आयोजन स्कूलने विजय मिळवला. आकुर्डीच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि भारती विद्यापीठ यांच्यातील लढतही गोलशून्य बरोबरीत सुटली.
इतर निकाल |
फुटबॉल |
मुली –
१) अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३ (प्रीती ७ मि., भाग्यश्री ८ मि., ऐश्वर्या १० मि.) वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टर – १ (तृप्ती काळे ९ मि.).
२) डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहगाव – २ (रिद्धी साबळे ९ मि., अक्षता बालबुधे १० मि.) वि. वि. अलन कॉलेज आॅफ आर्किटेक्चर – ० .
३) डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – २ (श्रृती तांबे १०, स्नेहल कुलकर्णी ११ मि.) वि. वि. महाराष्ट्र मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ०.
बास्केटबॉल |
मुले –
१) डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – १७ (गौरव १३ गुण) वि. वि. एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर – १६.
२) अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १८ (ओंकार १०) वि. वि. ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर – १५.
व्हॉलीबॉल ।
मुली –
१) भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज, अम्बी (२६-२४, २५-२०).
२) पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज वि. वि. आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर (२५-१७, २५-२३).
३) डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज वि. वि. भारती विद्यापीठ (२५-१९, २८-२६).