कोरोना व्हायरसपासून आता थोडी विश्रांती मिळाली नव्हती तोच, भारतातील काही राज्यांत बर्ड फ्लू या आजाराने थैमान घातले आहे. देशभरात झपाट्याने हा आजार पसरत असल्याने विविध राज्यांत अलर्ट जारी करण्यात आले आहेत. अशात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन याने वारासणी येथे फिरायला गेला असताना बर्ड फ्लूच्या नियमांचे उल्लंघन केले होते. आता याप्रकरणी शिखर धवनवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाराणसी दर्शनासाठी गेला होता धवन
धवन वाराणसीतील प्रसिद्ध बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी तसेच गंगा आरतीमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर वारासणीतील गंगा नदीमध्ये होडीने फिरण्याचा आनंद लुटताना धवनने जवळपासच्या पक्ष्यांना दाणे खाऊ घातले होते. यावेळचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर तेथील प्रशासनाने होडीचे मालक प्रदीप साहनी आणि सोनी साहनी यांच्यावर कारवाई केली होती. तसेच त्यांना पुढील आदेश येईपर्यंत गंगा नदीमध्ये होडी चालवण्यावर बंदी घातली होती.
धवनवर दाखल झाला गुन्हा
गंगा नदीमध्ये पक्षांना खायला टाकल्याने बर्ड फ्लू नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत स्थानिक वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी धवनवर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आता ६ फेब्रुवारी रोजी यावर कोर्टात सुनावणी होईल. यादिवशी हे प्रकरण योग्य की अयोग्य यासंदर्भात कोर्ट निर्णय घेणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यावर देखील २७ जानेवारी रोजी ऑनलाइन गेमचा प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/CKVzFwFASot/?utm_source=ig_web_button_share_sheet
बर्ड फ्लूसाठी बनली आहे सक्त नियमावली
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात बर्ड फ्लू या आजाराचे सावट पसरले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणासहित बरेच राज्य या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील तीर्थक्षेत्र वारासणी येथील प्रसिद्ध वारासणी घाटवर पक्ष्यांना दाणे खाऊ घालण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस
गोलंदाजाला चौकार पडल्यानंतर रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात, भरत अरुण यांनी उलगडले गुपित
चेन्नई कसोटीद्वारे होणार हार्दिक पंड्याचे पुनरागमन, ‘इतक्या’ वर्षांपुर्वी खेळला होता शेवटचा सामना