क्रिकेपटू मैदानावर जरी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरीही मैदानाबाहेर त्यांच्यात घट्ट मैत्री पाहायला मिळते. शुबमन गिल आणि इशान किशन, विराट कोहली आणि एबी डिविलियर्स अशी क्रिकेटपटूंमधील मैत्रीची उदाहरणे आपण पाहिली आहेत. आता भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याने यष्टीरक्षक रिषभ पंतसोबतच्या (Rishabh Pant) आपल्या निखळ मैत्रीचे दर्शन घडवले आहे.
दिल्ली प्रीमियर लीगचा पहिला हंगाम सुरू आहे. यामध्ये भारतीय संघाचे सर्व स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. दरम्यान, अनुभवी फलंदाज शिखर धवनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मिठी मारताना दिसत आहे. यावरुन दोघांमधील मैत्रीचे नाते स्पष्टपणे दिसून येते.
शिखर धवन साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाच्या सहमालकांपैकी एक आहे. तर पंत या लीगमध्ये खेळाडू म्हणून खेळताना दिसत आहे. नुकताच साऊथ दिल्ली सुपरस्टार्स आणि पुराणी दिल्ली टीम यांच्यात सामना झाला. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज पंतने 35 धावांची दमदार खेळी करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
धवनने पंतला मिठी मारली
सामन्यादरम्यान साऊथ दिल्ली सुपरस्टार्सचा सहमालक आणि भारतीय फलंदाज शिखर धवन सीमारेषेजवळ मुलाखत देत होता. त्याचवेळी पंत 35 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून बाद झाल्यानंतर पव्हेलियनकडे परतत होता. पंतला पॅव्हेलियनमध्ये परतताना पाहून धवनने मुलाखत अर्ध्यात थांबवली आणि त्याला मिठी मारली. भारतीय फलंदाजाच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Rishabh Pant hugs Shikhar Dhawan in Delhi Premier League.
📷 Jio Cinema pic.twitter.com/wkvTYRd3e6
— Aussies Army (Parody) (@AussiesArmyParo) August 17, 2024
हेडनने पंतचे कौतुक केले
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज मॅथ्यू हेडनने भारतीय संघाचा स्टार फलंदाज पंतवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याने पंतचे कौतुक केले आणि सांगितले की तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे.
हेही वाचा –
“ब्रो पुरा बॉलीवूड नाश्ते मे खाता है”, रोहितच्या कूल लूकवर चाहते फिदा; सूर्यकुमारचीही कमेंट
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री