Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान

लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान

February 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shoaib Akhtar

Photo Courtesy: Twitter/shoaib100mph/Screengrabs


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे महत्व खूप आहे. पाकिस्तानने नेहमीच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकासह भारतालाही टक्का देत आला आहे. पण पाकिस्तानचे खेळाडू एका बाबतीत नेहमी कमी पाडतात, ती म्हणजेच अचूक इंग्लिश. याच पार्श्वभूमीवर त्यांचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी कर्णधार बाबर आझमला सुनावले होते. अख्तरने यावेळी थेट लाईव्ह शोमध्ये त्याचा जुना सहकारी कामरान अकमल याचा अपमान केल्याचा दिसले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि चाहते अख्तरवर प्रचंड नाराज असल्याचेही पाहायला मिळत आहे.

पाकिस्तान संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आज जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण इंग्लिशच्या बाबतीत नेहमीच बाबर कमी पडतो. अनेकदा पत्रकार परिषदेत बोलण्यासाठी बाबरकडे इंग्लिश शब्द नसतात आणि यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले गेले आहे. रावलपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तर (Shoaib Akhtar) मात्र मैदानातील प्रदर्शनासह त्याच्या चांगल्या इंग्लिशसाठीही ओळखला जातो. अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मोठा समालोचकाची भूमिकाही बजावली. त्याच्या मते पाकिस्तानच्या इतर खेळाडूंना देखील इंग्लिश बोलता आले पाहिजे.

याच पार्श्वभूमीवर त्याने काही दिवसांपूर्वी बाबर आझम याला सुनावले. अख्तरच्या वक्तव्याच्या चांगलीच चर्चा झाली. ही चर्चा शांत होत असतानाच त्याचा अजून एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत अख्तर लाईव्ह शोमध्ये कामरान अकमल (Kamran Akmal) याला इंग्लिश शिकवत असल्याचे दिसते. “सकरीन नाही स्क्रीन,” असे अख्तर त्याला सांगताना दिसत आहे. दुसरीकडे कामरान मात्र शांतपणे सर्वकाही ऐकत आहे. आपल्याच सहकाऱ्याचा अशा प्रकारे लाईव्ह सामन्यात अपमान करणे चाहत्यांना मात्र जराही पटले नाहीये. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकजन खेळाडूंना इंग्लिज शिकणार्या अख्तरवर नाराज असून टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अख्तरने दिलेल्या एका मुलाखातीत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यपदाची इच्छा बोलून दाखवली. मला पाकिस्तान संघात सुपरस्टार खेलाडू घडवायचे आहेत आणि यासाठीच मी पीसीबी अध्यक्ष बनू इच्छितो असे अख्तर यावेळी म्हणाला. (Shoaib Akhtar insulted teammate on live show due to bad English)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आपली अडचण आपल्यालाच सोडवावी लागणार…’, कार्तिकडून केएल राहुलला पाठबळ!
डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थेडेच दिवस


Next Post
Photo Courtesy: Twitter

आयसीसीने दिला नागपूर आणि दिल्ली खेळपट्टीला 'रिमार्क'! भारतीय संघाला...

Australia Womens

नेहमीप्रमाणे यावेळीही उपांत्य सामन्यात स्मृती मंधाना अपयशी, पाहा कसा आहे यापूर्वीचा रेकॉर्ड

National Sailing

राष्ट्रीय नौकानयन । लष्कराच्याच दोन संघांत अंतिम झुंज

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143